अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीवर त्यांच्या सिनेमांबाबत, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. कुठल्याही अभिनेत्यावर आपली नक्कल करुन पोट भरायची वेळ यायला नको असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. क्रांतिवीर या सिनेमातल्या शेवटच्या सीनचे संवाद लिहिलेले नव्हते. जे मनाला येईल ते मी बोललो होतो. लोकांना खूप आवडलं असंही नाना पाटेकर म्हणाले आहेत. याच मुलाखतीत त्यांनी तनुश्री दत्ताने केलेले आरोपही फेटाळले आहेत. तसंच सिगारेटच्या व्यसनाबाबत आणि ते कसं सुटलं याबाबतही भाष्य केलं. राग येणं हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आताही राग येतो पण तो पूर्वीसारखा नाही असंही नाना पाटेकर म्हणाले.

देवावर विश्वास आहे का?

“मी देवापेक्षा जास्त माणसाला मानतो. देवाने तुम्हाला माणसाचा जन्म दिलाय. आता त्याला फार त्रास देऊ नका. आठ आणे टाकून लाख रुपये मागू नका. आपण आपलं काम करत राहायचं. जेव्हा जाऊ देवाकडे तेव्हा त्याच्याशी बोलू. देवावर श्रद्धा नाही असं नाही. माझी देवावर श्रद्धा आहे. मी प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या आश्रमात गेलो होतो. त्यातून काही क्लिप घेऊन माझा एक व्हिडीओही व्हायरल केला असं मी ऐकलं होतं. पण मी बागेश्वर धामला वगैरे गेलो नाही.” असं नाना पाटेकर म्हणाले.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

हे पण वाचा- नाना पाटेकरांची आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच म्हणाले, “आजही…”

एक काळ होता मी दिवसाला ६० सिगारेट ओढत असे

“एक काळ होता माझ्या आयुष्यात त्यावेळी मी दिवसाला ६० सिगारेट पित असे. अंघोळ करतानाही एका बाजूला हात ठेवून सिगारेट ओढत असे. मला सिगारेटचं खूप जास्त व्यसन लागलं होतं, माझ्या कारमध्येही कुणी तेव्हा बसायचं नाही कारण सिगारेटचा दुर्गंध यायचा. मी दारुचं व्यसन कधीही इतकं केलं नाही, पण सिगारेटच्या बाबतीत अट्टल होतो.” असं नाना पाटेकर म्हणाले.

बहिणीचं ते वाक्य आणि..

“माझ्या बहिणीचा एकुलता एक मुलगा वारला. मी त्यावेळी तिला भेटायला तिच्या घरी गेलो. मी सिगारेट ओढत होतो आणि खोकत होतो. तिने खोकताना मला पाहिलं. मला खूपच उबळ येत होती, माझ्याकडे बघून ती फक्त इतकंच म्हणाली की मला अजून काय काय बघायचं आहे? तिच्या या वाक्याचं मला खूप वाईट वाटलं. मी त्यानंतर सिगारेट ओढली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही सिगारेट ओढली नाही. मी तिसऱ्या दिवशीही सिगारेट ओढली नाही. तिच्या घरुन मुंबईला आलो, पाच दिवस मी सिगारेट ओढली नाही. त्यानंतर मी बहिणीला फोन केला तिची विचारपूस केली. तिला सांगितलं पाच दिवस झालेत मी सिगारेटला हात लावलेला नाही. ती म्हणाली तू कमी कर, तुला त्रास होतो. मी तेव्हा निश्चय केला की रोज स्वतःला सांगायचो आज सिगारेट ओढायची नाही. आजही स्वतःला हेच सांगतो की सिगारेट ओढायची नाही. आज वीस वर्षे झाली आहेत मी सिगारेटला हात लावला नाही.” असं म्हणत नाना पाटेकर यांनी सिगारेटच्या व्यसनावर आणि ते कसं सुटलं? यावर भाष्य केलं. द लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी हा किस्सा सांगितला.

Story img Loader