बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा हे दोघेही उद्या (१३ मे रोजी) साखरपुडा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दोघांच्याही साखरपुड्याची जय्यत तयारी केली जात आहे. साखरपुड्यासाठी परिणीतीच्या संपूर्ण घराला बाहेरून रोषणाई केल्याचे दिसत आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. या दोघांच्या साखरपुड्यासाठी खास थीम ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा- परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा भारतात येणार? चर्चांना उधाण
साखरपुड्याच्या तयारीसाठी परिणीती काही दिवस आधीच दिल्लीत पोहोचली होती. ड्रेसपासून डेकोरेशनपर्यंत सर्व काही खास थीमखाली तयार केले जात आहे. परिणीती-राघव दोघेही पंजाबी कुटुंबातील असल्यामुळे साखरपुड्याचा कार्यक्रम पंजाबी पद्धतीने होणार आहे. साखरपुडा समारंभात सकाळी सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या हातात अंगठी घालत साखरपुडा करतील. यानंतर छान डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.
परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी १५० लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असणार आहेत. परिणीतीची बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा या सोहळ्यात सहभागी होणार असून उद्या सकाळी ती दिल्लीत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- Video : प्रियांका चोप्राने ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला तेव्हा निक होता ७ वर्षांचा; खुद्द अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ क्षण
परिणीतीने पेस्टल कलर्सवर आधारित साखरपुड्याची थीम ठेवली आहे. परिणीती स्वतः एक अतिशय साधा आणि सुंदर लूक कॅरी करणार आहे. साखरपुड्यासाठी परिणीती प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेले कपडे परिधान करणार आहे. राघव आणि त्यांचे मामा आणि फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाईन केलेले कपडे परिधान करणार आहेत.