Anant Ambani-Radhika Merchant Wedding: सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी व्यक्ती म्हणजे ओरी. ओरहान अवतारमणी उर्फ ओरी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींचा खास मित्र आहे. त्यामुळे बॉलीवूड सेलिब्रिटींबरोबरचे त्याचे फोटो, व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. अशातच आता अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या ‘मामेरू’ कार्यक्रमातील त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

याआधी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील ओरीच्या फोटो व व्हिडीओंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. गुजरातमधील जामनगर येथे अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगमधील जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाबरोबर ओरीने काढलेले फोटो तुफान व्हायरल झाले होते. याशिवाय दुसऱ्या क्रूझ प्री-वेडिंगचे सर्वात आधी फोटो ओरीनेचे त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर आता अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ कार्यक्रमात डफली वाजवत जबरदस्त डान्स केलेला ओरीचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: वनतारा थीमने सजलेल्या रथावरून अनंत-राधिकाची ‘मामेरू’ कार्यक्रमात एन्ट्री, अंबानी-मर्चंट कुटुंबाने केलं जंगी स्वागत

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ व ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘मामेरू’ कार्यक्रमातील ओरीचे डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओत ओरी डफली वाजवत एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ कार्यक्रमासाठी ओरीने निळ्या रंगाचा कुर्ता व त्यावर जॅकेट परिधान केलं असून हटके शूज घातले आहेत. ओरीचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – दागिने, किराणा सामान अन् ‘इतक्या’ लाखांचा चेक…; अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळ्यात ५० गरीब जोडप्यांना काय-काय दिलं? जाणून घ्या…

हेही वाचा – “आयुष्यातला सर्वात मोठा घोटाळा..”, पूजा भट्टबरोबर झालेल्या ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच रणवीर शौरीने सोडलं मौन!, म्हणाला…

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं १२ जुलैला हिंदू पद्धतीनं लग्न होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम होणार असून १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader