बॉलीवूडची कोणतीही पार्टी असो, मोठा इव्हेंट असो वा अंबानी कुटुंबातील कोणताही कार्यक्रम असो. या सर्वांमध्ये एक चेहरा कॉमन असतो, तो म्हणजे ओरी. बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड अशी ओळख असलेला ओरहान अवत्रामणी त्याच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतो. बॉलीवूडमधील हायक्लास पार्ट्यांची झलक आपल्या सोशल मीडियावरून दाखवणाऱ्या ओरीने ‘द सुवीर सरन’ शोमध्ये राजकारण, लैंगिक ओळख, सेलिब्रिटींशी मैत्री याबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत.