सोशल मीडियावर ओरहान अवतारमणी उर्फ ओरी नेहमी चर्चेत असतो. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींचा ओरी चांगला मित्र आहे. नुकतीच त्याची वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात एन्ट्री झाली आहे. अशातच सध्या ओरीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ओरी अभिनेत्री जान्हवी कपूरबरोबर ‘पिंगा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

काही तासांपूर्वी ओरीने जान्हवी कपूरबरोबरचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “नेहमी मस्ती,” असं लिहित ओरीने चाहत्यांबरोबर हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघं ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. तसेच ते फुगडी घालताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – ‘अस्तित्व’ नाटक पाहून अभिनेते अजिंक्य देव यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भरतने रडवलं…”

ओरीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर जान्हवी कपूरने प्रतिक्रिया दिल्या आहेत. “बिग बॉससाठी तू मला विसरला”, “मला तुझी खूप आठवण येते”, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर जान्हवीने दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: शाहरुख खानच्या लेकीच्या डान्सने वेधलं लक्ष; अफेअरच्या चर्चेदरम्यान अगस्त्य नंदाबरोबर सुहानाचा रोमँटिक डान्स

दरम्यान, ओरीने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यामुळे नेमकं काय बदलणार? ओरी या तगड्या स्पर्धकांना पुरून उरणार की नाही? हे येत्या काही दिवसांत प्रेक्षकांना स्पष्ट होईल.

Story img Loader