बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड आणि मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेला ओरी नुकताच ‘बिग बॉस १७’ मध्ये गेला होता. तो दोन दिवस पाहुणा म्हणून या शोमध्ये राहिला. ओरीचे पूर्ण नाव ओरहान अवत्रामणी आहे. ओरीने ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापूर्वी सलमान खानशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्याच्याबद्दल विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलं होतं. पण आता ओरीने त्या विधानावरून यु-टर्न घेत आपण खोटं बोललो होतो, असा खुलासा केला आहे.
“ओरी काय काम करतो?” याबद्दल चाहत्यांना बरेच प्रश्न होते. सारा अली खान व अनन्या पांडे यांनाही ओरीच्या कामाबद्दल माहिती नव्हती. बिग बॉसच्या मंचावर जेव्हा सलमान खानने ओरीला याबाबत विचारलं तेव्हा त्याने उत्तर दिलं होतं. “मला इव्हेंट्समध्ये फोटोंसाठी पोज देण्याचे आणि पोस्ट करण्याचे पैसे मिळतात. मी एका रात्रीत या फोटोंमधून सुमारे २०-३० लाख रुपये कमावतो,” असं ओरी सलमानला म्हणाला होता. पण सत्य मात्र वेगळंच आहे, त्यानेच याबाबत माहिती दिली आहे.
एका रात्रीत ‘या’ कामातून २० ते ३० लाख रुपये कमावतो ओरी; खुलासा करत म्हणाला, “माझ्या स्पर्शानंतर…”
‘आयएएनसा’ला दिलेल्या मुलाखतीत ओरीने सेल्फी पोस्ट करण्यासाठी मिळणाऱ्या पैशांबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “मला माझं विधान खूप आवडलं. पण मी जरा अतिशयोक्ती केली. माझ्या एका वक्तव्याने ज्या प्रकारे हेडलाईन बनायला सुरुवात झाली ते पाहून मला खूप आनंद झाला. खरं तर, जर मी सेल्फी पोस्ट करून इतके पैसे कमावले असते, तर मी आज एका बेटावर राहत असतो. इथे राहून कष्ट करत नसतो.”
“मी सेल्फी पोस्ट करून इतके पैसे कमवत असतो तर खूप चांगलं झालं असतं. कारण पैसा असता तर मी एका बेटावर बोटीवर राहत असतो. मुंबईमध्ये एखाद्या श्वानासारखं काम करत नसतो. मी आता जसं जगतोय त्यापेक्षा कैकपटीने चांगलं आयुष्य जगत असतो. मला एका पोस्टसाठी २० ते ३० लाख रुपये मिळाले तर मी स्वतःला नशीबवान समजेन,” असं ओरीने या मुलाखतीत म्हटलं आहे.