बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड ओरी सध्या ‘बिग बॉस १७’ मुळे चर्चेत आहे. ओरीचे पूर्ण नाव ओरहान अवत्रामणी आहे. ओरीच्या सोशल मीडिया पोस्ट खूप चर्चेत असतात. कारण यामध्ये तो बॉलीवूडमधील जवळपास सर्व सेलिब्रिटींबरोबर दिसतो. बऱ्याचदा सिनेसृष्टीतील उच्चभ्रू पार्टीमधील फोटोही ओरीमुळेच चाहत्यांना पाहायला मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरात प्रवेश करण्यापूर्वी ओरीने शोचा होस्ट सलमान खानसोबत स्टेजवर गप्पा मारल्या. त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावेळी ओरीने सांगितलं की त्याने फोटोसाठी पोज देऊन सुमारे २०-३० लाख रुपये कमावले आहेत. हे ऐकून सलमानला धक्का बसला. ओरीने सांगितलं की लोक त्याला त्यांच्या पार्ट्यांमध्ये बोलावतात आणि त्यांच्या कुटुंबासह आणि मुलांबरोबर पोज देण्यास सांगतात.

Video: नऊ लाखांचे घड्याळ, दीड लाखांचे बूट, पाच मॅनेजर अन्… ‘बिग बॉस’मध्ये आलेल्या ओरीची लाईफस्टाईल बघून सलमानही झाला चकित

“मला इव्हेंट्समध्ये फोटोंसाठी पोज देण्याचे आणि पोस्ट करण्याचे पैसे मिळतात. मी एका रात्रीत या फोटोंसाठी सुमारे २०-३० लाख रुपये कमावतो,” असं ओरी म्हणाला. मग सलमान म्हणाला, “काहीतरी शिक सलमान, जग कुठे पोहोचलंय. तुला सेल्फीसाठी पैसे मिळतात, मी हे का करत नाही?” त्यानंतर सलमान ओरीला विचारतो की तुला जे बोलावतात त्यांना यातून काय फायदा होतो? ओरी म्हणाला, “माझ्या स्पर्शानंतर त्यांना असं वाटतं की त्यांचं वाढतं वय कमी होतंय आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्याही दूर होऊ शकतात.”

ओरी किती फोन वापरतो? असं सलमानने विचारलं. तो म्हणाला, “मी तीन फोन वापरतो, एक सकाळसाठी, एक दुपारसाठी आणि एक रात्रीसाठी. जेणेकरून बॅटरी डिस्चार्ज होणार नाहीत.” इतक्या फोनचे काय करतोस असं सलमानने विचारल्यावर ओरी म्हणाला, “चांगल्या फोटोंचे बरेच फायदे आहेत. तो क्षण आयुष्यभरासाठी टिकून राहतो, कारण हे फोटो आयुष्यभर सोबत राहतात. शिवाय चांगले एडिट करून ते फोटो पोस्ट करता येतात.” सलमानने त्याला “तू हे फोटो कोणासाठी अपलोड करतोस?” असं विचारलं. त्यावर ओरीने उत्तर दिलं, “जगातील सर्व मुलांसाठी. मी हे सर्व त्यांच्यासाठी करत आहे. एक दिवस हजारो ओरी असतील. यासाठीच मी तयारी करत आहे.” यावर सलमान म्हणाला, “मला भारताचं भविष्य दिसतंय.”

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी

ओरी फक्त दोन दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात होता. शनिवारच्या ‘वीकेंड का वार’ दरम्यान त्याने घरात प्रवेश केला आणि रविवारी त्याने घरातील सदस्यांचा निरोप घेतला. ताज्या एपिसोडमध्ये, अरबाज खान आणि सोहेल खान यांनी घरातील स्पर्धकांना सांगितलं की ओरी हा वाइल्ड कार्ड स्पर्धक नाही. ओरी घरात असताना अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, सनी आर्य आणि अभिषेक कुमार यांनी ओरीबरोबर मिळून खूप धमाल केली.

Bigg Boss 17: बॉलीवूड सेलिब्रिटींचा खास मित्र ओरी बिग बॉसच्या घरातून एका दिवसातच बाहेर, कारण…

दरम्यान, ओरीच्या ‘बिग बॉस’मधील मुक्कामादरम्यान बिग बॉसने स्पर्धकांना ओरीसाठी हाऊसवॉर्मिंग पार्टी आयोजित करण्याचे टास्क दिले होते. यावेळी आणि शोमधील तिन्ही घरं दिल, दिमाग आणि दम त्याच्यासाठी तीन वेगवेगळ्या पार्टी आयोजित करताना दिसले. या टास्कमध्ये ‘दिल’ घरातील सदस्य विजेते ठरले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orry says he earn 20 to 30 lakhs in one night by posing for selfies at party hrc