Anant Ambani Sangeet: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीरने फेब्रुवारी महिन्यात दीपिकाच्या प्रग्नेन्सीची गुडन्यूज चाहत्यांना दिली. नुकतीच या कपलने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळयाला हजेरी लावली होती. या सोहळ्यातील फोटो दीपिकाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.

दीपिका पदुकोण आणि ओरीचा व्हायरल फोटो (Deepika Padukone and Orry Viral Photo)

दीपिकाने या संगीत समारंभासाठी खास जांभळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती. या साडीत दीपिकाच्या बेबी बंपने लक्ष वेधून घेतलं. आता सोशल मीडिया सेन्सेशन ओरीने रणवीर आणि दीपिकासह एक खास फोटो शेअर केला आहे. यात ओरीने त्याची सिग्नेचर पोज दिली आहे. पण ओरीने दीपिकाच्या बेबी बंपवर हात ठेऊन फोटो काढला आहे. तर रणवीरने ओरीच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढला आहे.

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही वाचा… “मी आता कधीच आई होऊ शकत नाही”, राखी सावंतचं विधान चर्चेत; म्हणाली, “खूप वेदना…”

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला ओरीने डिझायनर सेट घातला होता. तर रणवीर सिंगने शेरवानी घातली होती. ओरीने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “पती, पत्नी और ओरी” दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “ओरी दत्तक घेतलेल्या मुलासारखा वाटतोय.” तर एकजण म्हणाला की, “यावरून कळतंय की, दीपिकाचं बेबी बंप खोटं नाही आहे, ओरीमुळे हे सिद्ध झालंय.”

हेही वाचा… “घोर अपमान…” , प्रिया बापट-उमेश कामतची रील चर्चेत; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचासंगीत सोहळा ५ जुलै रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर येथे पार पडला. बॉलीवूड, तसेच क्रिडा क्षेत्रातील मंडळींसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. तसंच रणवीर सिंगने या सोहळ्यात बॉलीवूड गाण्यांवर डान्स केला होता. तर जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरनेदेखील आपल्या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म करून बॉलीवूड कलाकारांना थिरकायला लावलं होतं.

हेही वाचा… …म्हणून ‘तारक मेहता’ फेम गुरुचरण सिंग झाला होता बेपत्ता; अभिनेता खुलासा करत म्हणाला, “घरी कधीच परत…”

दरम्यान, दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात ती झळकली होती. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात दीपिकासह साऊथ स्टार प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हसन, दिशा पटानी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. २७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ६०० कोटींचा बजेट असलेल्या ‘कल्की 2898 एडी’ने आतापर्यंत ८१५ कोटींची कमाई केली आहे.

Story img Loader