बॉलीवूड स्टार किड्सबरोबर अनेकदा पाहायला मिळणाऱ्या ओरहान अवत्रामणी म्हणजेच ओरीबद्दल तो नेमके काय काम करतो हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. इंटरनेट वर या प्रश्नाची विविध उत्तर मिळत असली तरी आता ओरी नेमके काय करतो हे ठामपणे सांगू शकणार आहे. कारण आता ओरी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

ओरी संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल प्रमुख भूमिकेत आहेत.

Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का नाकारला? ३१ वर्षांनी आलं कारण समोर; म्हणाली, “मी आणि शाहरुखने…”
Vinod Kambli Diagnosed with Clots in Brain| Vinod Kambli Health Update
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय
anil kapoor birthday bollywood journey
कधी ब्लॅकमध्ये तिकिटं विकली; तर कधी केलं स्पॉटबॉयचं काम, ‘असा’ आहे अनिल कपूर यांचा बॉलीवूडमधील प्रवास; जाणून घ्या
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Photo Of MLA Sanjay Kelkar.
BJP MLA : “मी लायक वाटलो नसेन…” मंत्रिपद न मिळाल्याने भाजपा आमदाराची खदखद
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”

हेही वाचा…कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…

ओरी प्रत्येक बॉलीवूड पार्टीत दिसतो आणि अंबानी कुटुंबाशीही त्यांचे जवळचे संबंध आहेत. ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, ओरीला ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात कॅमिओसाठी कास्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दीपिका पदुकोणही या चित्रपटात स्पेशल अपिअरन्समध्ये दिसू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

ओरी इंटरनेटवर फेमस आहे. त्याचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे १.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याच्या अकाउंटवर बॉलीवूडच्या अनेक पार्टींचे इनसाइड फोटोज पाहायला मिळतात. याशिवाय ओरी त्याच्या अकाउंटवरून अनेक मजेदार पोस्टसुद्धा करतो. तो प्रत्येक मोठ्या सिंगरच्या कॉन्सर्टला पोहोचतो आणि कधी-कधी विचित्र पोशाखात पापाराझींसमोर येतो, त्यामुळे ओरी नेहमी चर्चेत असतो.

हेही वाचा…Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”

ओरी गेल्यावर्षी ‘बिग बॉस १७’ मध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. या एपिसोडमध्ये ओरीने सलमान खानला त्याने फोटोसाठी पोज देऊन २० ते ३० लाख कमावले आहेत असे सांगितले होते. अनेक पार्टीसाठी ओरीला लोक घरी बोलावतात आणि त्याच्याबरोबर फोटोज काढतात असे त्याने सलमानला सांगितले होते.

हेही वाचा…श्याम बेनेगल यांचं निधन, समांतर सिनेमा जगणारा सच्चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

संजय लीला भन्साळी यांनी ‘हिरामंडी’ वेब सीरिजद्वारे ओटीटीच्या विश्वात पदार्पण केले, या सीरिजला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, त्यांनी २०२२ मध्ये आलिया भट्टला घेऊन ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट तयार केला होता. ‘लव्ह अँड वॉर’ व्यतिरिक्त भन्साळींच्या हातात ‘मन बैरागी’ हा प्रकल्प आहे, या चित्रपटाची ते निर्मिती करत आहेत.

Story img Loader