ओरी हे नाव आता प्रत्येकाच्या ओळखीचं झालंय. सोशल मीडियावर ओरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलीवूड कलाकारांसह ओरीनेही हजेरी लावली होती. या सोहळ्यातील ओरीच्या सिग्नेचर पोजनं पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ओरी नेहमी अशीच पोज का देतो, याचा प्रश्न आजवर अनेकांना पडला असेल. या प्रश्नाचा उलगडा बॉलीवूड स्टार रणवीर सिंहनं केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओरीनं त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यात रणवीर सिंहनं ओरीच्या सिग्नेचर पोजमागचं कारण स्पष्ट केलंय. या व्हिडीओत रणवीर ओरीची ओळख सगळ्यांना करून देतो आणि म्हणतो, “बंधू आणि भगिनींनो हा ओरी. आजपर्यंत मला माहीत नाही की ओरी नक्की काय करतो? आता ओरी एक केस स्टडी आहे, असं आपण मानू. ओरीचं विज्ञान असं आहे की, जर ओरीनं तुम्हाला स्पर्श करून, हात ठेवून, त्याची सिग्नेचर पोज देत तुमच्याबरोबर फोटो काढला असेल आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला, तर त्याच्या नजरेत तुम्ही मंजूर आहात आणि जर असं नसेल, तर तुम्हाला आणखी काम करण्याची गरज आहे.”

ओरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “ओरीचा स्पर्श राजा मिडाससारखा आहे”, “ओरी हा राष्ट्रीय खजिना आहे”, “ओरी एक सुपरस्टार आहे.” अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत.

हेही वाचा… कतरिना कैफचा पोलका डॉट ड्रेसमधील व्हिडीओ होतोय व्हायरल; चाहते म्हणाले, “गुड न्यूज…”

दरम्यान, ओरी नक्की काय करतो, असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतो. त्यानं अनेक मुलाखतींमध्ये याची वेगवेगळी उत्तरंदेखील दिली आहेत. अलीकडेच ओरी बिग बॉसच्या १७ व्या पर्वात वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून सामील झाला होता. बिग बॉसच्या घरी जाण्याआधी त्यानं सलमान खानबरोबर गप्पाही मारल्या होत्या. यावेळी ओरीनं सांगितलं होतं की, त्याला फोटोंसाठी पोज देण्याचे आणि ते पोस्ट करण्याचे २०-३० लाख रुपये मिळतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orrys signature pose ranveer singh opened up about why orry give pose with his hands on the celebrities chest dvr