95th Academy Awards 2023 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. दरवर्षी सर्वांचंच लक्ष या पुरस्कार सोहळ्याकडे लागलेलं असतं. यंदा ‘द एलिफंट विस्पर’ या भारतीय डॉक्युमेंटरीने आणि ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने भारतासाठी ऑस्कर पटकावला. आता त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी फारच खास ठरला. कारण ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. आता या यशाबद्दल बॉलिवूड सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…

आणखी वाचा : Oscar Awards 2023 Live : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ‘RRR’ने रचला इतिहास, ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘ऑस्कर’ पुरस्कार

गेले अनेक महिने ‘RRR’ या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. याचं कारण म्हणजे त्याला मिळालेला ऑस्कर नामांकन. आता या गाण्याला ऑस्कर मिळाला नाही सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. अभिनेत्री आलिया भट्टने देखील ‘RRR’ या चित्रपटात छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Oscar Awards 2023: ‘असं’ आहे यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील लाखो डॉलर्सचं गिफ्ट हॅम्पर, जाणून घ्या काय आहे त्यात आणि कोण ठरणार मानकरी

तिने नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला आहे असं सांगणारा एक पोस्टर शेअर केलं आणि लिहिलं, “आहा….” त्याचबरोबर तिनी सेलिब्रेशन करणारे इमोजीही पोस्ट केले. आता तिची ही स्टोरी खूप चर्चेत आली आहे.

Story img Loader