Oscars 2025 Nomination: ९७ व्या अकादमी पुरस्कारांसाठीची नामांकने आज जाहीर झाली आहेत. या ऑस्कर नॉमिनेशन २०२५ मध्ये भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांचा चित्रपट अनुजाला बेस्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहे.

महत्वाची बाब म्हणजे, या कॅटेगरीमध्ये सुमारे १८० चित्रपटांपैकी फक्त ५ बेस्ट चित्रपटांना बेस्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहे. अनुजाबरोबर नामांकन मिळालेल्या चित्रपटांमध्ये एलियन, आय एम नॉट अ रोबॉट, द लास्ट रेंजप आणि अ मॅन हू वुड नॉट रिमेन सायलेंट या चित्रपटांचा समावेश आहे.

अनुजाची स्टोरी काय आहे?

अनुजा ही एका ९ वर्षीय मुलीची गोष्ट आहे जी एका कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये तिच्या बहिणीबरोबर काम करते. या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की कसे एका निर्णयामुळे तिचे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलून जाते. ॲडम जे ग्रेव्हज (Adam J Graves) यांनी दिग्दर्शित आणि सुचित्रा मट्टाई (Suchitra Mattai) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाणार आहे.

गुनीत मोंगा यांना मिळालेलं हे तिसरं ऑस्कर नामांकन आहे. याआधी त्यांच्या प्रोजेक्ट्स, द एलिफंट विस्पर्स आणि पीरियड एन्ड ऑफ सेंटेंस यांना नामांकन मिळाले होते. अनुजा या चित्रपटाला २०२४ हॉलीशॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लाइव्ह ॲक्शन शॉर्ट अवॉर्ड मिळाला आहे. तसेच या चित्रपटाची कार्यकारी निर्माती अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे.

Story img Loader