सध्या देशात दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यंदा बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. मात्र सगळीकडे आनंदी वातावरण असताना एक घटना घडली. बॉलिवूड सेलिब्रेटी आणि पापाराझी यांच्यात कधी वाद तर कधी संवाद होतो. नुकताच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडीओत त्यांचे संपूर्ण घर दिव्यांनी सजवलेले आहे. पण जया बच्चन मात्र घराबाहेर उभ्या राहून मीडिया फोटोग्राफर्सना ओरडताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ एकीकडे व्हायरल होत असताना दुसरीकडे अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर माध्यमातील फोटोग्राफर्स आणि बंगल्याचे सुरक्षा रक्षक यांच्यात बाचाबाची झाली. माध्यमातील पत्रकारांनी बच्चन यांच्या घराबाहेर गर्दी करून आतील (बंगल्यातील) फोटो काढत होते तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकले मात्र तरीही फोटोग्राफर्स यांनी ऐकले नाही. म्हणून दोघांच्यात बाचाबाची झाली.

“आपल्या मातृभूमीतील…”; ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांचा सणसणीत टोला

अमिताभ बच्चन यांचा उंचाई चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यातील एक गाणेदेखील समोर आले आहे. पहिल्यांदाच या चित्रपटात अनेक दिग्गक्ज कलाकार दिसणार आहेत. तर एकीकडे अमिताभ बच्चन आपल्याला केबीसी कार्यक्रमातून भेटत असतात.

जया बच्चन या लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यात आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader