ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल करण्यात आले होत. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही यातील संवाद आणि दृश्यावरुन चित्रपटावर जोरदार टीका करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी तर चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखवल्यावरुन तोडफोड करण्यात आली आहे. प्रभू श्रीराम असो किंवा रावण कोणाचंही काम प्रेक्षकांना पसंत पडलेलं नाही.

चित्रपटातील संवाद बदलल्यावरही त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, लोकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. बऱ्याच कलाकारांनीही या चित्रपटावर टीका केली आहे. अशातच मुंबईचं मराठा मंदिर आणि गेटी गॅलक्सि या दोन्ही चित्रपटगृहांचे मालक मनोज देसाई यांनीही त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटात वापरली गेलेली भाषा अन् एकूणच आराध्य दैवातांचं अपमानजनक सादरीकरण पाहता निर्मात्यांनी माफी मागायला हवी असं मनोज देसाई यांनी म्हंटलं आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ तर आपटला, पण प्रभासचा ‘सलार’ कमावणार पहिल्याच दिवशी ‘इतके’ कोटी; वाचा ट्रेड एक्स्पर्ट्सचं मत

एका यूट्यूब चॅनल ‘फिल्मी फिवर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज देसाई म्हणाले, “या निर्मात्यांनी इतका टुकार चित्रपट सादर केला आहे की प्रेक्षक यांना कदापि माफ करणार नाहीत, प्रेक्षकच काय तर यांना खुद्द परमेश्वरही माफ करणार नाही.” ओम राऊतने एक जागा हनुमानासाठी राखीव ठेवण्याची विनंती केली त्यावर मनोज देसाई म्हणाले, “एक काय संपूर्ण चित्रपटगृह रिकामं आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या भावनांशी खेळायला नको होतं, बरेच मुस्लिम प्रेक्षकही याविषयी खेद व्यक्त करत आहेत.”

दरम्यान बॉक्स ऑफिसवरही ‘आदिपुरुष’ची हवा कमी होताना दिसत आहे. पहिले तीन दिवस सोडले तर सोमवारपासून चित्रपटाच्या कमाईमध्ये घटच होताना दिसत आहे. चित्रटपटाने आठव्या दिवशी अवघ्या साडेतीन कोटींचा गल्ला जमवला तर भारतात आतापर्यंत २६३.४० कोटी रुपये कमावले आहेत. आज आणि उद्या रविवारी वीकेंडमुळे याच्या कलेक्शनमध्ये वाढ होते की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Story img Loader