‘पारू’ या मालिकेने अगदी थोड्या वेळातंच प्रेक्षकांचं मन जिंकलं. पारूची भूमिका साकारणारी शरयू सोनावणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. शरयू सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी शरयू मालिकेच्या सेटवरील धमाल मस्ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेत दिशा हे खलनायिकेचं पात्र साकारणारी पूर्वा शिंदेबरोबर शरयू अनेकदा डान्स रील्स बनवत असते. अलीकडेच “ए कंचन” या ट्रेंडिग गाण्यावर दोघी थिरकल्या होत्या. तर दोघींनी प्रसादबरोबर ‘पुष्पा-२’च्या “अंगारो सा” या गाण्यावरदेखील हूकस्टेप करत डान्स केला होता. तो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पुष्पा चित्रपटातील ‘अंगारो’ हे गाण नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्याच्या हूकस्टेपने सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. गाण रीलिज झाल्यानंतर अनेक कलाकारांनी ही हूकस्टेप करत सोशल मीडियावर रिल्स शेअर करायला सुरुवात केलीय.

हेही वाचा… “काकाच जास्त एन्जॉय…”, ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांनी तेलुगू गाण्यावर केला हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल होताच चाहते म्हणाले…

अशातच दोघी पुन्हा एकदा याच गाण्यावर थिरकल्या आहेत. या डान्सचा व्हिडीओ पूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हे गाणं रीलिज झाल्यापासून ट्रेंडिंग आहे. सोशल मीडिया इंफ्लूएन्सर्स ते कलाकार या गाण्यावर थिरकताना दिसतायत.

हेही वाचा… ‘हीरामंडी’ फेम ताह शाह कान फिल्म फेस्टिवलमध्ये राहिला होता उपाशी, म्हणाला, “मी जेवलोच नाही…”

दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. अगदी काही वेळातच या व्हिडीओला तीन हजारांपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. दोघींच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे. शरयू आणि पूर्वाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडीओ व्हायरल होताच अभिनेत्रींच्या चाहत्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “खूप सुंदर दिसतंय”, तर दुसऱ्याने “अप्रतिम” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा… आमिर खानने नाकारला होता महेश कोठारेंचा ‘हा’ चित्रपट, किस्सा सांगत म्हणाले, “माझ्या डोक्यात वेड्यासारखा विचार…”

दरम्यान, झी मराठीवरील ‘पारू’ ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. ‘पारू’ मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, विजय पटवर्धन, शंतनू गंगणे, अतुल कासवा, देवदत्त घोणे, अनुज साळुंखे, श्रुतकीर्ती सावंत यांच्या निर्णायक भूमिका या मालिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru fame sharayu sonawane purva shinde reel on pushpa 2 song dvr