प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी व आपल्या सौंदर्याने जगाला मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री पद्मा लक्ष्मी यांचं अफेअर व लग्न फार चर्चेत राहिलं होतं. या दोघांची भेट एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे होती. सलमान रश्दी आणि पद्मा लक्ष्मी यांची पहिली भेट १९९९ मध्ये न्यूयॉर्कमध्ये एका पार्टीदरम्यान झाली होती. दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि ते एकमेकांना आवडू लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मिता पाटील यांच्याशी झालेल्या भांडणावर शबाना आझमींनी ३७ वर्षांनी सोडलं मौन; म्हणाल्या, “मी तिच्याबद्दल जे बोलले…”

पहिली भेट झाली त्यावेळी सलमान रश्दी ५१ वर्षांचे होते तर पद्मा लक्ष्मी अवघ्या २८ वर्षांची होती. प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हणतात, ते या दोघांच्या प्रेम कथेतही पाहायला मिळालं. त्यांनी वयातील अंतराचा विचार बाजुला सारून एकमेकांना भेटायला सुरुवात केली. १९९९ ते २००४ पर्यंत त्यांच्या भेटीगाठी सुरूच होत्या. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १७ एप्रिल २००४ रोजी या दोघांनी लग्न केलं.

हेही वाचा अभिनयासाठी शिक्षण सोडलं, सुपरहिट चित्रपटांमध्ये केलं काम; लहानपणीच ज्योतिषाने वर्तवलेलं ‘सूर्यवंशम’ फेम अभिनेत्रीच्या मृत्यूचं भाकीत

डेटिंगनंतर लग्न करणाऱ्या या जोडप्याचं नातं मात्र फार काळ टिकू शकलं नाही. अवघ्या तीन वर्षांमध्ये त्यांच्या नात्यातील दुराव्याची माहिती समोर आली. या लग्नातील प्रेमाचा हंगाम संपल्यानंतर पद्मा लक्ष्मीच्या आयुष्यात अशी वेळ आली जेव्हा तिला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. परिणामी तिने २००७ मध्ये सलमान रश्दींपासून घटस्फोट घेतला.

हेही वाचा – गर्भवती पत्नीला भर कार्यक्रमात ओढत नेल्याने ट्रोल, सना खानचा पती मुफ्ती अनस आहे तरी कोण?

विभक्त झाल्यानंतर पद्मा लक्ष्मीने रश्दींवर अनेक गंभीर आरोप केले होते. पद्मा लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, सलमान रश्दी काही मानसिक आजाराने त्रस्त होते. ते सतत शारीरिक संबंध ठेवण्यास विचारायचे व नकार दिल्यास त्यांना राग यायचा. आजारी असतानाही सलमान रश्दींनी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पद्मा लक्ष्मीने केला होता. पद्मा लक्ष्मीच्या या आरोपांना उत्तर देत रश्दी यांनी ‘मुलींना लग्न करायचे असते, पण ते निभवायचे नसते’ असे विधान केले होते.