Rakhi Sawant Dodi Khan : कॉन्ट्रोव्हर्सी व ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळीही चर्चेचं कारण तिचं लग्न आहे. राखी सध्या तिच्या तिसऱ्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी राखीने दावा केला होता की ती पाकिस्तानची सून होणार आहे. ती पाकिस्तानी अभिनेता डोडी खानशी लग्न करत आहे, मात्र आता डोडीने नकार दिला आहे. तसेच त्याने राखी सावंतची माफीही मागितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच राखी सावंतने म्हटलं होतं की ती पाकिस्तानी अभिनेता आणि पोलीस अधिकारी डोडी खानच्या प्रेमात आहे आणि दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. “आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो. तो पाकिस्तानचा आहे आणि मी भारताची आहे, त्यामुळे आम्ही प्रेमविवाह करणार आहोत,” असं राखी म्हणाली होती. न्यूज 18 शी बोलताना राखीने तिच्या तिसऱ्या लग्नाबद्दल माहिती दिली होती. पाकिस्तानची सून झाल्यावरही नेहमीच भारताची मुलगी राहीन, असं राखीने म्हटलं होतं.

डोडी खानने लग्नाला दिला नकार

राखी सावंतच्या लग्नाची बातमी दिल्यानंतर आता डोडी खान म्हणाला की, त्याने राखीला प्रपोज केलं होतं, पण आता तो लग्न करणार नाही. राखीने तिच्या आयुष्यात खूप दु:ख पाहिलंय, तिच्या धाडसीपणामुळेच ती आवडते, असं डोडीने म्हटलं होतं.

एका व्हिडीओमध्ये डोडी म्हणाला, “नमस्कार भारत आणि पाकिस्तान, मी डोडी खान आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही सोशल मीडियावर माझा एक व्हिडीओ पाहिला असेल, ज्यात मी राखी सावंतला प्रपोज केले होते. मी तिला चांगलं ओळखतो, त्यामुळे मी तिला प्रपोज केलं होतं. मला समजलं की तिचा देवावर खूप विश्वास आहे. तिने तिच्या आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले आहेत, तिने तिचे आई-वडील गमावले आहेत, ते आजारी असताना ती त्यांच्याबरोबर होती.”

डोडी पुढे म्हणाला, “तिच्या आयुष्यात एक मुलगा आला, त्याने तिच्याबरोबर काय केलं, ते तुम्हा सर्वांना माहीत आहे. ती त्या धक्क्यातून बाहेर आली आहे. तिने इस्लाम धर्म स्वीकारला, उमराहसाठी गेली आणि तिचे नाव बदलून फातिमा ठेवले. मला ते खूप आवडलं म्हणून मी तिला प्रपोज केलं.”

डोडीने लग्नाला नकार का दिला?

लग्नाला नकार देण्याचं कारण सांगत डोडी म्हणाला, “पण, मला वाटतं की लोकांना हे नातं मान्य नाही. कारण मला खूप मेसेज आणि व्हिडीओ आले आहेत आणि मला ते सहन करू शकत नाही. राखी तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस आणि कायम राहशील. पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, मी तुला वचन देतो की तू पाकिस्तानची सून होशील. मी तुझे लग्न माझ्या एका भावाशी लावेन.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani actor dodi khan refused to marry rakhi sawant says apne kisi bhai se karwaunga shaadi hrc