अनेक पाकिस्तानी कलाकारांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांवर भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आली, त्यानंतर हे कलाकार भारतीय चित्रपटांमध्ये दिसले नाही. सिनेसृष्टीत काम करण्यावर बंदी असली आणि ते भारतात येऊ शकले नसले तरी अनेक पाकिस्तानी कलाकारांची भारतीय स्टार्सशी मैत्री आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) याने त्याच्या बॉलीवूडमधील मित्रांबाबत सांगितलं आहे.

फवाद खानने अलीकडेच अनेक बॉलीवूड अभिनेते व चित्रपट निर्माते, खासकरून रणबीर कपूर आणि करण जोहर यांच्याशी असलेल्या त्याच्या मैत्रीबद्दल भाष्य केलं. अजूनही रणबीर, करणसह आणखी काही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या संपर्कात असल्याची कबुली फवादने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली.

Video: ऐश्वर्या राय-आराध्या बच्चनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, बिग बींच्या नातीने वळून पाहिलं अन् पापाराझींना म्हणाली…

कपूर कुटुंब व करण जोहरशी मैत्री

‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत फवाद खान म्हणाला, “मी अनेकांशी संपर्कात आहे. आम्ही मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, त्यामुळे मी संपर्कात आहे. रणबीर कपूरच्या कुटुंबाशी माझे खूप चांगले संबंध आहेत. करण जोहर आणि शकुन (बत्रा) यांच्याबरोबर अजून संपर्कात आहे. त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे, त्यामुळे अजूनही मैत्री टिकून आहे.”

बर्लिनमध्ये Naked Party मध्ये सहभागी झाली बॉलीवूड अभिनेत्री, २० मिनिटांत काढला पळ; म्हणाली, “मला कुणाचेही प्रायव्हेट पार्ट…”

fawad khan ranbir kapoor
फवाद खान व रणबीर कपूर आहेत चांगले मित्र

फवाद खान पुढे म्हणाला, “असे काही निर्माते मित्र आहेत ज्यांच्याशी मी खूप वेळा बोलत असतो. आम्ही कुठेतरी भेटायचे प्लॅन्स बनवत असतो आणि भेटल्यावर आम्ही खूप गप्पा मारतो, आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहतो आणि आम्ही अजूनही आमच्यात मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. आमच्यातील प्रेम अजूनही कायम आहे.”

‘या’ अभिनेत्याने राधिका-अनंतची करून दिली ओळख? मुकेश अंबानींनी त्याला ३० कोटींची दिली भेटवस्तू? त्याचे वडील म्हणाले…

रणबीरचा ॲनिमल चित्रपट पाहिला का?

याच मुलाखतीदरम्यान त्याने रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ चित्रपट पाहिला आहे का? असं फवादला विचारण्यात आलं. त्यावर हा चित्रपट अद्याप पाहिला नसल्याचं त्याने सांगितलं. “मी अजून हा सिनेमा पाहिलेला नाही, पण मला तो पाहायचा आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर आहे, पण मला ते पाहण्याची संधी मिळाली नाही. मला बरेच जण तो सिनेमा पाहण्यास सांगत आहेत,” असं फवाद म्हणाला.

पाकिस्तानी सुपरस्टार फवादने सोनम कपूरच्या ‘खूबसूरत’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यासोबत ‘कपूर अँड सन्स’ आणि अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांच्यासह ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांमध्येही काम केलं होतं. लवकरच तो टीव्ही मालिका ‘बरजाख’ मध्ये दिसणार आहे. या मालिकेत तो ‘जिंदगी गुलजार है’ मधील त्याची सहकलाकार सनम सईदबरोबर बऱ्याच वर्षांनी पुन्हा काम करणार आहे.