Pakistani Actress Dance On Bollywood Song : बॉलीवूड गाण्यांची क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहे. विशेषत: ९० च्या दशकातली आणि २००१ ते २०१५ दरम्यानची बॉलीवूड गाणी सर्वत्र विशेष लोकप्रिय आहेत. या गाण्यांनी सिनेप्रेमींच्या मनावर एक वेगळी जादू निर्माण केली आहे. माधुरी दीक्षित, कतरिना कैफ, शाहरुख खान, करिश्मा कपूर, मलायका, करीना कपूर या कलाकारांनी त्यांच्या अभिनयासह नृत्याविष्याकाराने सुद्धा अनेकांना भुरळ पाडली.
‘ढोलना ते छैया छैया’पर्यंत बॉलीवूड कलाकारांची अनेक गाणी सोशल मीडियावर कायम ट्रेडिंग असतात. याच लोकप्रिय गाण्यांवर एका पाकिस्तानी अभिनेत्रीने ठेका धरल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने तिची सहकलाकार यशमा गिलच्या बहिणीच्या लग्नात जबरदस्त डान्स केल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हानिया आणि यशमा या दोघी आरोबा गिलच्या लग्नात अनेक बॉलीवूड गाण्यांवर थिरकताना दिसल्या.
माधुरी दीक्षितने २००१ मध्ये म्हणजेच साधारण २४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लज्जा’ चित्रपटातील “बडी मुश्किल…” गाण्यावर मनिषा कोइरालाच्या साथीने जबरदस्त डान्स केला. हानिया आणि यशमा या दोघींचीही एनर्जी तसेच नृत्याविष्कार लक्षवेधी ठरला. हानियाने यावेळी हिरव्या आणि सोनेरी रंगाचा भरजरी लेहेंगा घातला होता.
हेही वाचा : दोन लोकप्रिय मालिकांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप, नेटकरी म्हणाले, “एवढ्या लवकर का संपवली?”
‘या’ बॉलीवूड गाण्यांवर थिरकली पाकिस्तानी अभिनेत्री
माधुरीच्या “बडी मुश्किल…” गाण्याप्रमाणेच हानियाने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय दत्त आणि शिल्पा शेट्टी यांच्या ‘जंग’ चित्रपटातील ‘आयला रे लडकी मस्त मस्त…’ या गाण्यावरही डान्स केला. जॅझी बीच्या ‘जीने मेरा दिल लुटिया’ या सुपरहिट गाण्यावर हानिया जमिनीवर बसून जबरदस्त डान्स करताना दिसली. इतकंच नव्हे तर या अभिनेत्रीने कतरिना कैफच्या ‘चिकनी चमेली’ गाण्यावर सुद्धा ठुमके लगावले आहेत.
हेही वाचा : Video : न्यू इअरचं सेलिब्रेशन करून रणबीर कपूर-आलिया भट्ट राहासह मुंबईत परतले, एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, हानिया आमिरबद्दल सांगायचं झालं, तर तिने अभिनय कारकिर्दीची सुरुवात कॉमेडी चित्रपट ‘जनान’ (२०१६ ) मधून केली. याशिवाय तितली ( २०१७ ) मधून तिने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. कभी मैं कभी तुम (२०२४) या रोमँटिक ड्रामा सीरिजमुळे हानिया सर्वत्र लोकप्रिय झाली. सोशल मीडियावर अनेकदा ती बॉलीवूड गाण्यांवर व्हिडीओ शेअर करत असते.