पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आणि बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांची ९० च्या दशकात खूप चर्चा झाली होती. दोघांचे अफेअर होते, अशा अफवा होत्या. मात्र कधीच सोनाली किंवा शाहिदने याबद्दल प्रतिक्रिया दिली नव्हती. आता बऱ्याच वर्षांनी शाहिदला यासंदर्भात विचारण्यात आलं. त्याने काय उत्तर दिलं, ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कराची आर्ट्स कौन्सिलशी गप्पा मारताना शाहिदला त्याच्या व सोनालीच्या नात्याबद्दल ज्या चर्चा झाल्या होत्या, त्याबद्दल विचारलं गेलं. सोनाली बेंद्रेला शाहिद आफ्रिदी आवडतो, अशा गोष्टी आम्ही ऐकल्या होत्या; यात काय सत्य होतं? तुम्ही मित्र होतात का? असं विचारल्यावर शाहिद म्हणाला, “आता थोड्या वेळेआधी तू मला आजोबा झालाय, असं म्हटलं. आता त्याच आजोबांबद्दलच्या या जुन्या गोष्टी काढतोय.” हे ऐकून होस्ट म्हणाला तुमचा नातू लहान आहे, त्यामुळे या गोष्टी त्याला समजणार नाहीत. यावर शाहिदने म्हटलं, “आता हे सगळं डिलिट करा. आता आम्ही मोठे झाले आहोत.”

हेही वाचा – ‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”

शाहिद व सोनालीबद्दल त्या काळी चर्चा झाल्या होत्या, मात्र दोघांनी यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही. सोनालीबद्दल बोलायचं झाल्यास तिने २००२ मध्ये गोल्डी बहलशी लग्न केलं. दोघेही २२ वर्षांपासून आनंदाने संसार करत आहेत. या जोडप्याला रणवीर नावाचा मुलगा आहे. सोनालीला कॅन्सर झाल्यानंतर तिने काही काळ सिनेविश्वातून ब्रेक घेतला होता. मात्र आता ती अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते. रिअॅलिटी शोची परीक्षक म्हणूनही तिने काम केलं. तसेच तिची ‘ब्रेकिंग न्यूज’ या सीरिजच्या दोन्ही भागात महत्वाची भूमिका होती.

हेही वाचा – नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

४७ वर्षीय शाहिद आफ्रिदीने अवघ्या २० व्या वर्षी नादियाशी लग्न केलं होतं. या जोडप्याला पाच मुली आहेत. यावर्षी ऑगस्ट महिन्यात शाहिद आजोबा झाला. त्याची मुलगी अंशा आणि जावई शाहीन शाह आफ्रिदी यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. शाहिद आपल्या नातवाबरोबरचे फोटो शेअर करत असतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani cricketer shahid afridi reacts on relationship rumours with sonali bendre hrc