गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी आहे. या विषयावरून बऱ्याचदा गदारोळ झाला होता. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच लोकांनी या गोष्टीचा विरोधही केला होता अन् यावरुन त्यांच्यावर जबरदस्त टीकाही झाली होती, पण आता मात्र एक लोकप्रिय पाकिस्तानी गायक लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहेत.

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम तब्बल ७ वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा होत आहे. ‘Love story of 90s’ या चित्रपटाच्या माध्यमातून आतिफ अस्लम कमबॅक करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिनेता अध्ययन सुमन व मिस युनिव्हर्स इंडिया झालेली दिविता राय हे दोघे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे निर्माते यांनीच आतिफ अस्लमच्या कमबॅकबद्दल भाष्य केलं आहे.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
Nana Patekar recalls memories of smita patil
“स्मितामुळे मी सिनेमात आलो, नाहीतर…”, नाना पाटेकरांचा पहिला बॉलीवूड चित्रपट कोणता? सांगितली ४६ वर्षांपूर्वीची आठवण

आणखी वाचा : “मला याचा पश्चात्ताप…” चित्रपटविश्व सोडून राजकारणात प्रवेश करण्याबद्दल राज बब्बर स्पष्टच बोलले

निर्माते म्हणाले, “आतिफ अस्लम तब्बल ७ ते ८ वर्षांनी कमबॅक करणार आहे. हा आमच्यासाठी एक आशीर्वादच आहे. आतिफने आमच्या चित्रपटाचे पहिले गाणे गायले आहे याचा आम्हाला आनंदच आहे. तो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. त्याला या गण्यासाठी तयार करणं फार कठीण होतं, कारण तो चित्रपटाची कथा आणि पात्र यांचा बारकाईने अभ्यास करतो. २०२४ चं हे सर्वात सुपरहीट गाणं ठरेल अशी आमची खात्री आहे. या गण्याचं संगीत, शब्द तसेच चित्रीकरण सगळंच उत्तम जुळून आलं आहे.”

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या हल्ल्यानंतरच सिने वर्क्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांवर भारतामध्ये काम करण्यास पूर्णपणे बंदी घातली. यामुळे बरेच नावाजलेले कलाकार, अभिनेते गायक यांनी हिंदी चित्रपटात काम करणं बंद केलं. अजूनही पाकिस्तानी कलाकार भारतात काम करण्यास फारसे उत्सुक नसतात.

आतिफ अस्लमचे साऱ्या जगभरात असंख्य चाहते आहेत. २००८ मधील ‘किस्मत कनेक्शन’ चित्रपटातील ‘बाखूदा तुम्ही हो’ या गाण्यामुळे आतिफला खरी ओळख मिळाली. नंतर ‘रेस’ चित्रपटातीलही त्याचं गाणं हीट झालं. २००९ आली आलेल्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’साठी आतिफ अस्लमने दोन गाणी गायली जी कमालीची गाजली. शेवटचं आतिफने सलमानच्या २०१७ सालच्या ‘टायगर जिंदा है’साठी गाणं म्हंटलं. आता तब्बल ७ वर्षांनी आतिफचा आवाज पुन्हा बॉलिवूडमध्ये गुंजणार आहे. भारतातील त्याचे चाहते त्याच्या या आगामी गाण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

Story img Loader