बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानने त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी आणि एकूणच चित्रपट रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. चित्रपटगृहात इतिहास रचल्यानंतर आता ‘पठाण’ ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल एका पाकिस्तानी अभिनेत्याने वक्तव्य केलं आहे.

‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकीनीमुळे वाद निर्माण झाला होता. मात्र शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. जगभरातून चित्रपटाने १००० कोटींच्या वर व्यवसाय केला आहे. अशातच एका पाकिस्तानी अभिनेत्याने ‘पठाण’ चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. यासिर हुसेन असं या अभिनेत्याचे नाव असून त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली आहे.

Sonu Nigam
लाईव्ह शोमध्ये सोनू निगमच्या पाठीत सुरू झाल्या वेदना; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आयुष्यातील सर्वात कठीण…”
Bollywood actors Aamir Khan Reaction To Being Called A 60 Year Old Goes Viral
Video: “६० वर्षांचा झालास”, असं म्हणताच आमिर खान…
chhaava director lakshman utekar reveals most emotional scene
विकीने १५ टेक घेतले, ढसाढसा रडला अन्…; ‘छावा’च्या दिग्दर्शकाने सांगितला सेटवरचा ‘तो’ प्रसंग, लक्ष्मण उतेकर म्हणाले…
Sonakshi Sinha Sells Bandra Apartment
बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईतलं घर विकून कमवला ६१ टक्के नफा; खरेदी अन् विक्रीची रक्कम किती?
Neil Nitin Mukesh
नील नितीन मुकेशला अधिकाऱ्यांनी घेतलं होतं ताब्यात; न्यूयॉर्क विमानतळावरील प्रसंग सांगत म्हणाला…
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
Bollywood singer udit Narayan desires for bharat ratna amid Kissing Scandal, Says He Has No Regret
उदित नारायण यांनी भारतरत्न मिळण्याची इच्छा केली व्यक्त, व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाले, “मला पश्चाताप झाला नाही”
Shahid Kapoor starr Deva box office collection day 2
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाच्या कमाईत वाढ, दोन दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला 
Bollywood actress Sonam Kapoor breaks down in tears while walking the ramp video viral
Video: रॅम्प वॉक करताना अचानक सोनम कपूर ढसाढसा रडू लागली, नेमकं काय झालं? जाणून घ्या…

घटस्फोटानंतर सिंगल असलेल्या समांथाला चाहत्याने विचारला रिलेशनशिपबद्दलचा प्रश्न; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…

अभिनेत्याने स्टोरीमध्ये असं लिहलं आहे की “जर तुम्ही मिशन इम्पॉसिबल १ पाहिला असेल तर तुम्हाला शाहरुख खानचा पठाण तुम्हाला कथा नसलेला एक व्हिडीओ गेम वाटू शकतो.” अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान ‘पठाण’ आता हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून सोशल मीडियावर याबद्दल चांगलीच चर्चा होत आहे. एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली २’ चित्रपट २८ एप्रिल २०१७ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, त्याच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर ५१०.९९ कोटींची कमाई केली होती. शाहरुख खानच्या या चित्रपटात दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत आहे. शाहरुख आणि जॉनने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे

Story img Loader