अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी सध्या चांगलीच चर्चेत आहे. सलमानच्या चित्रपट ‘किसी का भाई किसी जान’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं आहे. काही दिवसांपूर्वी पलकने सलमान खानच्या सेटवरील एक नियम सांगितला होता. सलमानच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचे अवयव नीट झाकले जातील असे कपडे घालायची सक्ती करण्यात आल्याचं पलकने स्पष्ट केलं होतं. पलक तिवारीच्या या वक्तव्यांनंतर चर्चांना चांगलेच उधाण आले होते. आता पलकने या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा- शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘जवान’ चित्रपटाची तारीख निर्मात्यांनी ढकलली पुढे, समोर आले मोठे कारण

vidya balan refused to work in bhul bhulaiyya 2
विद्या बालनने ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाला ‘या’ कारणामुळे दिलेला नकार, निर्मात्यांनी केला खुलासा
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Daljeet Kaur
पूर्वाश्रमीच्या पतीवर दलजीत कौरचा आरोप; म्हणाली, “त्याने वर्षभर आमच्या मुलाकडे…”
Annu Kapoor recalls on kiss controversy
Annu Kapoor: “मी हिरो असतो तर…”, प्रियांका चोप्राचा किस देण्यास नकार, संतापलेले अन्नू कपूर काय म्हणाले?
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल
ias shailbala martin question loudspeakers in temples
“मंदिरांवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण होतं, मग…” महिला IAS अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत!
Mahesh Manjrekar Reaction on Adinath Kothare Paani Movie
“विषय लीलया पेलला”, ‘पाणी’ चित्रपटावर प्रतिक्रिया देताना महेश मांजरेकरांनी आदिनाथ कोठारेचं केलं कौतुक अन् आजकालच्या अभिनेत्रींना दिला सल्ला
Young man cheated and raped in Vasai carime
रॉंग नंबर तिला महागात पडला..; तरुणाने फसवून केला बलात्कार

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पलकने म्हटले आहे की, “गैरसमज हा आमच्या कामाचा एक भाग आहे, माझ्या आणि सलमान सरांमधील बातम्यांमुळे मला आश्चर्य वाटत नाही, कारण मला माहित आहे की ते खूप समजूतदार व्यक्ती आहे. त्याच्याबद्दल मी कधीही वाईट बोलणार नाही हेही त्यांना माहीत आहे. माझ्याकडून चूक झाली, मी शिकेन आणि मी या गोष्टीची नेहमी काळजी घेईन” असं पलक म्हणाली.

काय म्हणाली होती पलक?

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, श्वेता तिवारीची लेक व अभिनेत्री पलक तिवारीने सलमानच्या चित्रपटाच्या सेटवर मुलींच्या कपड्यांबद्दल एक नियम असल्याचं म्हटलं होतं. आता तिने त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. सलमान खानच्या चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचं शरीर नीट झाकलं जाईल, असे कपडे घालायची सक्ती करण्यात आल्याचं पलकने म्हटलं होतं.

हेही वाचा- अनुष्का शर्मा ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये करणार पदार्पण; फ्रान्सच्या राजदूतांनी शेअर केले फोटो

पलकच्या वक्तव्यावर सलमान खानने सौडलं मौन

सेटवरील कपड्यांच्या नियमाबाबात पलकने केलेल्या वक्तव्यावर सलमान खानने मौन सोडले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सलमान खान म्हणाला, “मला वाटते की, महिलांचे शरीर खूप मौल्यवान असते. महिलांचे शरीर जितके झाकलेले असेल तितके योग्य आहे.”

पलक आणि इब्राहिम अली खानच्या नावाची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून पलक तिवारीचे नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत जोडले जात आहे. मात्र, पलकने या वृत्तांवर मौन तोडले आहे. तिने सांगितले की इब्राहिम माझा फक्त एक चांगला मित्र आहे आणि ती त्याला फारशी ओळखत नसल्याचेही पलकने म्हणलं आहे.