कलाकारांबरोबर स्टार्किड्सही चांगलेच चर्चेत असतात. यापैकीच एक म्हणजे सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान. इब्राहिम मनोरंजन सृष्टीत जरी नसला तरीही त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तो पलक तिवारीला डेट करत आहे अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगल्या होत्या. अशातच त्या दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पालक तिवारी एकमेकांचे खूप चांगले मित्र मैत्रीण आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये पार्ट्यांमध्ये ते एकत्र दिसत असतात. त्यांचा एकमेकांबरोबर एकत्र फिरणं वाढल्यामुळे ती दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेली अनेक दिवस रमताना दिसत आहेत. अशातच त्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत, जे पाहून पलकच सैफ अली खानची होणारी सून आहे की काय असं नेटकरी म्हणू लागले आहेत.

आणखी वाचा : Video: पाणी प्यायला नकार, पुस्तक घेतलं अन्…; छोट्या सारा अली खानचा चित्रपटाच्या सेटवरील क्युट व्हिडीओ पाहिलात का?

इब्राहिम अली खान आणि फलक तिवारी यांनी नुकतीच अभिनेता करण मेहताच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. यावेळी त्या दोघांनी एकत्र पोजही दिल्या. यावेळी पलकने कळ्या रंगाचा वन पीस, तर इब्राहिमने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्यांचे हे मॅचिंग कपडे पाहून पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांच्या अफेअर्सच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

हेही वाचा : “तुझा बॉयफ्रेंड कोण आहे?” अखेर सारा अली खानने दिलं उत्तर, म्हणाली…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पलकने या चर्चांवर मौन सोडत आत्ता तिला कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे असं म्हणून या चर्चांना पूर्णविराम लावला होता. आता त्यांचे नवीन फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ती दोघं खरंच एकमेकांना डेट करत आहेत, असं नेटकरी म्हणू लागले आहेत.

Story img Loader