अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पदार्पणाच्या आधीपासून पलक तिवारी व सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम यांच्या लिंक-अपच्या बातम्या येत आहेत. गेल्या वर्षी पलक इब्राहिमबरोबर अनेकदा स्पॉट झाली होती. एकदा पापाराझींना पाहिल्यावर पलकने तिचा चेहरा लपवला होता.
विवाहित चित्रपट निर्मात्याच्या प्रेमात पडलेल्या जया प्रदा; दोघांनी गुपचूप लग्नही केलं, पण…
पलक व इब्राहिमने आतापर्यंत या अफवांबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण नुकताच पलक तिवारीने ‘इ टाइम्स’ला इंटरव्ह्यू दिला. यावेळी ती आणि इब्राहिम अली खान एकमेकांना डेट करत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आली. उत्तर देत ती म्हणाली, “दोन चित्रपटांच्या शूटिंगमुळे मी आयुष्यात खूप व्यग्र आहे आणि मी समाधानी आहे. काम करणं हाच माझा उद्देश आहे आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे वर्ष आहे. मी या अफवांकडे लक्ष देत नाही, कारण हा माझ्या व्यवसायाचा एक भाग आहे. त्यापेक्षा मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करेन.”
पलक तिवारी प्रेमाबद्दल म्हणाली, “प्रेम कधीच मुद्दाम केले जात नाही आणि त्याचे मोजमापही करता येत नाही. प्रेमाची मोजमाप करता येत नाही आणि कधी, कुठे आणि कोणाशी प्रेम होईल हे सांगता येत नाही. या टप्प्यात माझ्यासाठी काम माझी प्राथमिकता आहे. व्यावसायिकदृष्ट्या हा काळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच मी सध्या त्यावर लक्ष केंद्रित करत आहे.”
पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या गाण्याने पलक प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पलकच्या बॉलिवूड डेब्यूची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होती. आता अखेर ती सलमानच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.