अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं. ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता तिचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे आणि त्यावरून ती ट्रोल होत आहे.
पलक तिवारी विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असते. नुकतीच ती एका बॉलीवूड इव्हेन्टला पोहोचली. पण तिथे तिने जे काही केलं त्यामुळे नेटकरी तिच्यावर चांगलीच टीका करत आहेत.
पलक एका इव्हेंटला खूप स्टायलिश अंदाजात पोहोचली होती. या कार्यक्रमाच्या वेळी तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. त्या कार्यक्रमाला अभिनेता ईशान खट्टरही हजर होता. त्याने सोनेरी रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. पण पलक आणि ईशान जेव्हा समोरासमोर आले तेव्हा पलकने ईशानला खूप ॲटिट्युड दाखवला. ईशान नम्रपणे पलकला पुढे येण्यास सांगत होता पण पलकने मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
हेही वाचा : Video: श्वेता तिवारीची लेक होणार सैफ अली खानची सून? इब्राहिम-पलकचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
तिच्या या कृतीवरून नेटकरी तिच्यावर नाराज झाले आहेत. सोशल मीडियावरून नेटकरी ही नाराजी व्यक्त करत आहेत. एकाने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, “खूप ॲटिट्युड आणि शून्य मॅनर्स…तिने ईशानला साधं हॅलोही केलं नाही.” तर दुसऱ्याने लिहिलं, “कुठल्या गोष्टीचा ॲटिट्युड दाखवत आहे!” तर आणखी एकाने लिहिलं, “स्वतःकडे काहीही नसतानाही ॲटिट्युड पाहा.” त्यामुळे आता पलक ट्रोल होऊ लागली आहे.