अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पलक तिवारी व सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम यांच्या लिंक-अपच्या बातम्या येत आहेत. अनेकदा या दोघांना एकत्रही बघण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा दोघांना एकत्र बघण्यात आलं आहे. दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा- ‘गदर २’ पाहायला गेलेल्या तरुणाचा सिनेमा सिनेमागृहात मृत्यू, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
Ankita Walawalkar and Suraj Chavan meeting video has goes viral on social media
Video:…म्हणून अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणची घेतली उशीरा भेट, म्हणाली, “पॅडी दादा…”
Kartik Aaryan’s Surprise Visit to Bhool Bhulaiyaa 3 Theatre Goes Viral – A Girl was Too Busy with Popcorn
कार्तिक आर्यन समोर अन् पोरगी पॉपकॉर्न खाण्यात बिझी, VIDEO पाहून म्हणाल असा अ‍ॅटिट्यूड हवा!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पलक आणि इब्राहिम मुव्ही डेटवर गेल्याचं दिसून येत आहे. मुंबईच्या बांद्रातील एका चित्रपटगृहाबाहेर दोघांना एकत्र बघण्यात आलं आहे. यावेळी पलकने हलका निळा डेनिम ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता. तर इब्राहिमने पांढऱ्या टी-शर्टसह गडद राखाडी जीन्स आणि स्नीकर्स घातले होते.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत पलकने इब्राहिमबरोबरच्या लिंक-अपच्या चर्चांवर मौन सोडत स्पष्टीकरण दिलं होतं. पलक म्हणालेली, “दोन चित्रपटांच्या शूटिंगमुळे मी आयुष्यात खूप व्यग्र आहे आणि मी समाधानी आहे. काम करणं हाच माझा उद्देश आहे आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे वर्ष आहे. मी या अफवांकडे लक्ष देत नाही, कारण हा माझ्या व्यवसायाचा एक भाग आहे. त्यापेक्षा मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करेन.”

हेही वाचा- ‘गदर’ सुपरहिट ठरला तरी मिळत नव्हते सनी देओलला काम; अभिनेत्याने स्वत: सांगितले कारण, म्हणाला….

“प्रेम कधीच मुद्दाम केले जात नाही आणि त्याचे मोजमापही करता येत नाही. प्रेमाची मोजमाप करता येत नाही आणि कधी, कुठे आणि कोणाशी प्रेम होईल हे सांगता येत नाही. या टप्प्यात माझ्यासाठी काम माझी प्राथमिकता आहे. व्यावसायिकदृष्ट्या हा काळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच मी सध्या त्यावर लक्ष केंद्रित करत आहे.”