अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं. ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता पुन्हा एकदा तिचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. तिने डेट करू नये यासाठी श्वेता तिच्याशी खूप कठोर वागायची असं तिने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉलीवूड बबल’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये पलकने शेवता तिवारीबद्दलच्या अनेक गोष्टी उघड केल्या. पलक कोणालाही डेट करू नये यासाठी श्वेता पूर्ण खबरदारी घ्यायची. इतकंच नाही तर त्यावरून श्वेता पलकला धमकीही द्यायची असं वक्तव्य करत तिने काही जुन्या आठवणी शेअर केल्या.

आणखी वाचा : “ती अनेकदा माझे फोनही उचलत नाही…” पलक तिवारीचा आई श्वेता तिवारीबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, “मी सलमान खानच्या…”

पलक म्हणाली, “माझा एक बॉयफ्रेंड होता. तेव्हा मी १५ किंवा १६ वर्षांची होते. आम्हाला मॉलमध्ये जायला खूप आवडायचं, मी एकदा तिच्या बरोबर मॉलमध्ये जात असताना आईला सांगितलं की मी खाली खेळायला जात आहे. त्यावर तिने परवानगी दिली. त्यावेळी ती शहरात नव्हती आणि मग तिला कुठूनतरी कळलं की मी खेळत नसून मॉलमध्ये आहे. तिला खूप राग आला. गमतीशीर गोष्ट अशी की ती मला गावाला पाठवेल, ती माझे केस कापून टाकेल अशी धमकी द्यायची. जेव्हा मी छोटी होते तेव्हापासून सुंदर दिसू नये यासाठी तिने माझ्या केसही कापले होते. जेणेकरून मी कोणालाही डेट करू नये.”

हेही वाचा : Video: श्वेता तिवारीची लेक होणार सैफ अली खानची सून? इब्राहिम-पलकचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पलक तिवारीचं हे बोलणं आता चांगलंच चर्चेत आलं आहे. याआधी देखील पलकने अनेकदा श्वेता तिच्याशी किती कठोर वागते आणि आईचा तिच्यावर कसा धाक आहे हे सांगितलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palak tiwari revealed shweta tiwari used to ne strict with her in matter of dating rnv