‘द काश्मीर फाइल्स’च्या घवघवीत यशानंतर काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ची घोषणा केली, तेव्हापासून देशभरात हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. गेले अनेक महिने ते या चित्रपटावर काम करत आहेत. मध्यंतरी या चित्रपटाचा एक छोटासा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला व त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली.
भारताने बनवलेली कोविडची लस अन् त्यामागचा संघर्ष या चित्रपटातून समोर येणार आहे. देशात कोविड काळात कशा प्रकारे वॅक्सिन तयार करण्यात आली आणि त्यामागे असलेली कित्येक महिलांची मेहनत ही गोष्ट विवेक अग्निहोत्री या चित्रपटाच्या माध्यमातून मांडणार आहेत. ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे.
आणखी वाचा : ‘बाजीगर’मधील शाहरुखची भूमिका बऱ्याच लोकांनी का नाकारली? दलिप ताहील यांनी सांगितलं यामागील कारण
आता या चित्रपटाशी निगडीत एक नवी अपडेट समोर येत आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. पल्लवी जोशी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक रिवील करण्यात आले आहेत.
या पोस्टरमध्ये नाना पाटेकर व पल्लवी जोशी हे प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्यांचा फर्स्ट लूक या पोस्टरच्या माध्यमातून समोर आला आहे. याबरोबरच सप्तमी गौडा, गिरिजा ओक, रायमा सेन व अनुपम खेर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सगळ्या कलाकारांची ओळख या पोस्टरमधून करून देण्यात आली आहे. ‘भारतातील पहिला बायो-सायन्स चित्रपट’ असं म्हणत पल्लवीने हे पोस्टर शेअर केले आहे. येत्या २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.