करोना महामारीनंतर चित्रपटांना प्रेक्षक मिळत नव्हते. सुरुवातीची दोन वर्षे चित्रपट निर्मात्यांसाठी व थिएटर मालकांसाठी फार चांगली राहिली नाही. त्या तुलनेत २०२३ हे वर्ष भारतीय चित्रपटांसाठी व खासकरून बॉलीवूडसाठी खूप चांगले राहिले. यावर्षी फक्त हिंदीच नाही तर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांनीही चांगली कमाई केली. ‘जवान’, ‘पठाण’, ‘गदर २’, ‘ओएमजी २’, ‘टायगर ३’, ‘ड्रीम गर्ल २’, ‘अॅनिमल’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. पण असेही काही चित्रपट होते, ज्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. याच यादीत एक असा चित्रपट आहे, ज्याची देशभरात फक्त ५० तिकिटं विकली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजॉय भार्गव दिग्दर्शित ‘पंच कृती: फाइव्ह एलिमेंट्स’ हा चित्रपट ऑगस्ट २०२३ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये बृजेंद्र कालासह इतर काही कलाकार होते. ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ सिनेमागृहांमध्ये चांगला व्यवसाय करत असताना हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर शाहरुख खानचा ‘जवान’ प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. यादरम्यान ‘पंच कृती’ प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात अयशस्वी ठरला.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार काय काम करतो? जाणून घ्या

‘बॉलीवूड हंगामा’च्या आकडेवारीनुसार, ‘पंच कृती’ने पहिल्या आठवड्यात केवळ १० हजार रुपये कमावले होते, त्यानंतर त्याला चित्रपटगृहांमधून काढून टाकण्यात आले. व्यावसायिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरासरी तिकीटाची किंमत २०० रुपये लक्षात घेता या चित्रपटाची कदाचित फक्त ५० तिकिटं विकली गेली असेल. ‘पंच कृती’ने ३५ कोटींचा व्यवसाय केल्याचा चित्रपट निर्मात्यांनी दावा केला आहे परंतु या दाव्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही अधिकृत डेटा नाही.

सैफ अली खानने अवघ्या २१ व्या वर्षी अमृता सिंहशी लग्न का केलं होतं? आता तिच्याशी कसं नातं आहे? उत्तर देत म्हणाला…

‘पंच कृती’ हा कमी बजेट असलेला व छोटी स्टारकास्ट असलेला चित्रपट होता आणि हा २०२३ मधील एकमेव मोठा फ्लॉप नव्हता. याशिवाय अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अयशस्वी ठरले. यात अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘लेडी किलर’चाही समावेश आहे. २०२३ या वर्षातील इतर मोठ्या फ्लॉपमध्ये टायगर श्रॉफचा ‘गणपत’ देखील आहे. या चित्रपटाचे बजेट २०० कोटी होते आणि त्याने फक्त १० कोटी रुपये कमावले. तसेच आदिपुरुष ५५० कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. ज्याने जगभरात फक्त ३२५ कोटी रुपये कमावले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panch kriti bollywood flop movie of 2023 earned only 10 thousand hrc
Show comments