‘मिर्झापूर’ फेम पंकज त्रिपाठींनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सिनेमा वा ओटीटी, माध्यम कोणतेही असो; पंकज त्रिपाठींच्या अभिनयाचे कौतुक सर्व स्तरांतून करण्यात येते. सध्या पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी ‘मैं अटल हूं’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित असेल.
हेही वाचा : बहुचर्चित ‘8AM मेट्रो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! उमेश कामत दिसणार ‘या’ भूमिकेत
पंकज त्रिपाठी या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेत असून त्यांनी या संदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पंकज त्रिपाठींनी लवकरच ‘मैं अटल हूं’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल अशी माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.
‘मैं अटल हूं’ चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होईल, असे सांगत पंकज त्रिपाठी लिहितात, “माणूस व्हा, केवळ नावाने नाही, रूपाने नाही, दिसण्याने नाही; तर हृदयाने, बुद्धीने, शासनाने, ज्ञानाने – असे उच्च विचार अटल बिहारी वाजपेयी यांचे होते. अटल बिहारी वाजपेयींनी समाजाला ही व्याख्या सांगितली अन् ते मानवतेची भाषा बनले!”
हेही वाचा : ‘त्या’ चुकीमुळे माझे करिअर उद्ध्वस्त झाले असते; प्रियांका चोप्राने केला खुलासा
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे रवी जाधव करणार आहेत. ‘आम्ही प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहोत’ अशा प्रतिक्रिया पंकज त्रिपाठी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या आहेत.