अक्षय कुमारच्या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओ माय गॉड’ (OMG) चित्रपटाच्या सीक्वेलची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ‘ओ माय गॉड’चित्रपटाचा सीक्वेल ‘OMG 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारसह दिग्गज अभिनेते पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांनी या चित्रपटात ‘कांतीशरण मुदगल’ हे पात्र साकारले आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “अवघ्या २ दिवसांत…”, ‘सुभेदार’च्या ट्रेलरने रचला नवा विक्रम! चिन्मय मांडलेकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत असलेला ‘OMG 2’ चित्रपट लैंगिक शिक्षणावर आधारित असल्याने या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट दिले गेल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पंकज त्रिपाठी यांना यावर आधारित अनेक प्रश्न विचारण्यात आले. इंडिया फोरम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते म्हणाले, “आपल्या समाजात लैंगिक शिक्षणाबाबत कोणीही उघडपणे संवाद साधत नाही. हे एकदम चुकीचे आहे. आपल्या मुलांना विशिष्ट वयात लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे.”

हेही वाचा : ९३ वर्षीय दिग्दर्शक आणि ‘ही’ ज्येष्ठ अभिनेत्री ‘सुभेदार’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका, चिन्मय मांडलेकरने केला खुलासा…

“तुम्ही कधी तुमच्या मुलीबरोबर लैंगिक शिक्षणाबाबत संवाद साधला आहे का?” या प्रश्नाला उत्तर देताना पंकज त्रिपाठी म्हणाले, “साधारणत: भारतातील कोणत्याच कुटुंबांमध्ये लैंगिक शिक्षणाबद्दल उघडपणे माहिती दिली जात नाही. मी माझ्या मुलीबरोबर याविषयी चर्चा केली होती. तिचा बाबा सर्वात आधी तिचा मित्र आहे, आमच्यात एक फार सुंदर नातं आहे. त्यामुळे एकमेकांचे मित्र म्हणून आम्ही या गोष्टींवर संवाद साधलाय. काय बरोबर काय चुकीचे? यातील फरक मी तिला समजावून सांगितला. अशाप्रकारचे संवाद मोकळेपणाने प्रत्येक घरात व्हायला हवेत. आमच्या ‘OMG 2’ या चित्रपटामुळे समाजात या सगळ्या विषयांबाबत चर्चा सुरु होईल.”

हेही वाचा : “२०० टेक, पॅनिक अटॅक अन्…”, ‘रॉकी और रानी’ फेम अभिनेत्रीने सांगितली ऑडिशनची आठवण; म्हणाली, “खूप रडले…”

दरम्यान, ‘OMG 2’ या चित्रपटाचे संपूर्ण कथानक कांतीशरण मुदगल (पंकज त्रिपाठी) यांच्या कुटुंबावर आधारित आहे. त्यांच्या मुलाने चुकीचे पाऊल उचलल्यावर त्यांना शंकराचा दूत म्हणजेच अक्षय कुमार न्यायालयीन लढ्यात कसा मदत करतो? यावर हा चित्रपट आधारित आहे. ‘OMG 2’ ११ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘OMG 2’ सह बहुचर्चित ‘गदर २’ चित्रपटही एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj tripathi on having sex education talks with his daughter amid omg 2 movie release sva 00