बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेते म्हणून पंकज त्रिपाठींना ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर पंकज त्रिपाठींनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकज त्रिपाठींनी आजपर्यंत निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. पंकज त्रिपाठींचे खरे अडनाव खरे अडनाव दुसरचं होते. त्यांनी आपले मूळ अडनाव बदलून त्रिपाठी करुन घेतले आहे.
पंकज त्रिपाठी यांचे खरे आडनाव तिवारी आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडीलही तिवारी हेच आडनाव लावायचे. पण पंकज त्रिपाठी यांनी मात्र त्यांच्या आडनावात बदल केला आणि आडनाव बदलून तिवारीचं त्रिपाठी केले. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी आडनाव बदलण्यामागचे कारण सांगितले.
ते म्हणाले, ‘इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असेल की एखाद्या वडिलांना आपल्या मुलामुळे नाव मिळाले. मी दहावीचा प्रवेश अर्ज भरत होतो. माझ्या काकांचे आडनाव त्रिपाठी होते आणि ते सरकारमध्ये अधिकारी होते. आणखी एक व्यक्ती होते ज्यांचे आडनाव त्रिपाठी होते. ते हिंदीचे प्राध्यापक होते. पण माझे आडनाव तिवारी होते. या अडनावाचे व्यक्ती एकतर पुजारी किंवा शेतकरी होते. मला वाटायचे हे सगळं आडनावामुळेच होत आहे.
पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले, “मला कधीच शेतकरी किंवा पुजारी व्हायचे नव्हते. म्हणून मी फॉर्ममध्ये माझे नाव त्रिपाठी असे लिहिले. पण नंतर मला वाटले की मी माझ्या वडिलांचे नाव तिवारी लिहू शकत नाही कारण ते नाकारले जाऊ शकते. म्हणून मी त्यांचेही नाव बदलले.”
मुलाखतीदरम्यान पंकज त्रिपाठी यांनी बिहारमधील त्यांच्या मूळ गावी बेलसंड येथील बालपणीची आठवणही सांगितली. पंकज त्रिपाठी म्हणाले, “लहानपणी मी सायकलवर स्टंट करायचो कारण एक मुलगा होता जो असे स्टंट करायचा आणि तो मुलींमध्ये खूप प्रसिद्ध होता. मी सातवीत किंवा आठवीत शिकायचो. त्यावेळी शाळेत स्लो सायकल रेस आयोजित करण्यात आली होती, त्या शर्यतीचा विजेता ठरलेला मुलगा मुलींमध्ये खूप प्रसिद्ध झाला होता. मीसुद्धा हे शिकलो. मला वाटलं पुढच्या वर्षी मी विजेता होईल, पण मी हरलो.”
दरम्यान, पंकज त्रिपाठीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, काही महिन्यांपूर्वीच त्यांचा ‘ओह माय गॉड २’ व ‘फुकरे ३’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नुकतीच त्यांची ‘कडक सिंह’ ही वेब सिरीज OTT वर प्रदर्शित झाली आहे. आता पंकज लवकरच ‘मैं अटल हूं’मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. हा बायोपिक येत्या १९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.