‘मैं रहूं या ना रहूं ये देश रहना चाहिये – अटल’ हा दिवंगत राजकारणी आणि भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. हा बायोपिक डिसेंबर महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका पंकज त्रिपाठी साकारत आहेत. या चित्रपटाच्या शुटिंगचा अनुभव सांगताना त्यांनी सकस आहाराचं महत्त्व सांगितलं. तसेच शूटिंग करत असताना आपण दोन महिने फक्त खिचडी खाल्ली होती, असा खुलासा त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Photos: आमिर खानच्या लेकीचं पहिलं केळवण! आयरा खान-नुपूर शिखरेचा अस्सल मराठमोळा अंदाज, विहीणबाईंचा वेगळाच थाट

‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी म्हणाले, “अटल चित्रपटासाठी मी सुमारे ६० दिवस शूट केले आणि त्या ६० दिवसांमध्ये मी फक्त खिचडी खाल्ली, तीही मी स्वतःच बनवली होती. मी इतर कुणालाही माझ्यासाठी स्वयंपाक करू दिला नव्हता.” त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. “तुम्हाला माहीत नसतं की इतर लोक खिचडी कशी बनवतील. कारण मी त्यात तेल किंवा मसाला टाकत नाही. मी फक्त साधी डाळ, तांदुळ आणि घरात उपलब्ध असलेल्या भाज्या वापरून खिचडी बनवतो,” असं त्यांनी नमूद केलं.

Tabu Birthday Special: तब्बू – अनवट वाटेवरची वलयांकित नायिका

ते म्हणाले, “मी लहान असताना समोसा खाऊनही अभिनय करू शकत होतो. पण आता शेवटचा समोसा कधी खाल्ला ते आठवत नाही. आता मात्र मला माझी पाचनक्रिया नीट ठेवण्यासाठी सात्विक आहार घ्यावा लागतो.” कलाकारांनी फक्त निरोगी राहण्यासाठीच नव्हे तर त्यांच्या भूमिका, पात्रांच्या भावना चांगल्या प्रकारे सादर करण्यासाठी योग्य आहार घेणं का महत्त्वाचं आहे, हे देखील सांगितलं.

“एक अभिनेता म्हणून जर तुमचे पोट ठीक नसेल आणि तुम्ही आरोग्यास हानिकारक अन्नपदार्थ खाल्ले आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही भावना व्यक्त करू शकाल, तर तुम्ही चुकीचे आहात. म्हणूनच शूटिंगच्या दिवसात मी फक्त खिचडीच खातो. खरं तर तुम्ही साकारत असलेल्या पात्राच्या भावना नीट पोहोचवण्यासाठी तुमच्या मेंदू आणि शरीर यांच्यात समन्वय असणं आवश्यक आहे. त्यासाठी कलाकारांनी हलका-फुलका आहार घ्यावा,” असा सल्ला पंकज त्रिपाठी यांनी दिला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj tripathi reveals he ate khichdi for 60 days while shooting atal bihari bajpayee hrc