अभिनेते पंकज त्रिपाठी हे बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. मनोरंजन सृष्टीतील कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना ते स्वतःच्या मेहनतीच्या बळावर अभिनेते म्हणून काम करू लागले आणि त्यांनी मनोरंजन सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. पण त्यांचं खरं आडनाव त्रिपाठी नाही. त्यांनी त्यांचा आडनाव का बदललं हे त्यांनी ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकज त्रिपाठी यांचं खरं आडनाव पंकज तिवारी आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडीलही तिवारी हेच आडनाव लावायचे. पण पंकज त्रिपाठी यांनी मात्र त्यांच्या आडनावात बदल केला आणि आडनाव बदलून तिवारीचं त्रिपाठी केलं. असं त्यांनी का केलं याचा खुलासा त्यांनी केला आहे.

आणखी वाचा : “मी ठरविले आहे, यापूढे मी कोणत्याही कलाकृतीत…” अभिनेते पंजक त्रिपाठी यांनी घेतला मोठा निर्णय

पंकज त्रिपाठी म्हणाले, “आमच्या घरी माझ्या वडीलधाऱ्यांना चित्रपट काय असतो याची काहीही कल्पना नव्हती. चित्रपट हे माध्यम काय असतं हेच माहीत नसल्याने मी या क्षेत्रात जेव्हा काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कोणीही मला अडवलं नाही. मला जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचं होतं तेव्हा त्यांनी मला विचारलं, यानंतर तू काय काम करणार? तेव्हा मी म्हणालो की, मी नाटक शिकवणारा प्राध्यापक होणार. तेव्हा ते खुश झाले. कारण आमच्याकडे असा विचार केला जायचा की काहीही करून सरकारी नोकरी करायला लागा. त्यामुळे मी एनएसडीमधून शिकल्यानंतर प्राध्यापक बनणार ही त्यांना खूप चांगली गोष्ट वाटली.”

हेही वाचा : अभिनेता पंकज त्रिपाठीची कौतुकास्पद कामगिरी, लावला पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हातभार

पुढे ते म्हणाले, “आमच्याकडे संपूर्ण गाव तिवारी असं आडनाव लिहितं. तिवारी आणि त्रिपाठी एकच आहे. त्यामुळे कोणी तिवारी लिहितं, कोणी त्रिपाठी लिहितं. जास्त करून उत्तर प्रदेशमध्ये तिवारी लिहितात आणि बिहारमध्ये त्रिपाठी लिहितात. पण आमच्या गावात अशा दोनच व्यक्ती होत्या ज्या त्यांचं आडनाव त्रिपाठी लावायच्या. एक माझे काका काशिनाथ त्रिपाठी. ते मोठ्या पदाची सरकारी नोकरी करायचे. दुसरे म्हणजे रामनरेश त्रिपाठी. ते हिंदीचे मोठे प्राध्यापक, विद्वान बनले होते. मी जेव्हा नववीत असताना दहावीचा फॉर्म भरत होतो. तेव्हा मी विचार केला की जे तिवारी आडनाव लावतात ते सगळे शेती करतात, भिक्षुकी करतात. पण जे दोन जण त्रिपाठी आडनाव लावतात ते आज मोठ्या पदावर आहेत. तेव्हा मी नववीत असताना १० वीच्या फॉर्मवर माझं नाव पंकज त्रिपाठी असं केलं आणि माझ्या वडिलांचं ही नाव फॉर्ममध्ये येणार असल्याने त्यांचंही आडनाव त्रिपाठी असं लिहिलं. त्यामुळे मी असा पहिलाच मुलगा आहे ज्याने वडिलांचं आडनाव बदललं.”