‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’, ‘लुडो’, ‘स्त्री’, ‘लुका छुपी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करून पंकज त्रिपाठी आजच्या घडीला बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांची उत्कृष्ट अभिनय शैली, हिंदी भाषेवरचे प्रभुत्व यांमुळे ते सामान्य प्रेक्षकांमध्ये जास्त लोकप्रिय झाले. बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे पंकज त्रिपाठी वर्षातून दोन वेळा वाढदिवस साजरा करतात. एका वर्षात दोन वाढदिवस ऐकून थोडे नवल वाटते. याबद्दल त्यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
हेही वाचा : कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने शेअर केले जुने फोटो, तुम्ही ओळखलंत का?
पंकज त्रिपाठींना Mashable युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत ५ की २८ सप्टेंबर नेमका तुमचा वाढदिवस केव्हा असतो? असा प्रश्न विचारण्यात आला. “यावर उत्तर देताना ते म्हणाले, माझा जन्म २८ सप्टेंबर १९७६ रोजी झाला. त्यामुळे २८ सप्टेंबरला माझा खरा वाढदिवस असतो. परंतु, लहान असताना शाळेत नावनोंदणी करताना माझा भाऊ गेला होता. माझ्या भावाला तेथील बाईंनी माझी जन्मतारीख विचारली. तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हते.”
हेही वाचा : ‘ही’ आहे सर्वात श्रीमंत अभिनेत्री, शाहरुख-सलमानपेक्षाही कमावते जास्त पैसा, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क
“माझा भाऊ शाळेतील बाईंना म्हणाला, मला सप्टेंबर महिना लक्षात आहे पण, त्याची तारीख लक्षात नाही. तेव्हा त्यांनी घरी न विचारता तिथल्याच कोणाचा तरी सल्ला ऐकून तारखेत ५ सप्टेंबर असा बदल केला. तेव्हापासून सगळ्यांना माझे दोन वाढदिवस आहेत असे वाटू लागले. ५ सप्टेंबरलाच ‘शिक्षक दिवस’ सुद्धा साजरा केला जातो त्यामुळे एका अर्थाने ही चांगली गोष्ट आहे. मी दोन्ही वाढदिवस साजरे करतो.” असे पंकज त्रिपाठी यांनी सांगितले.
दरम्यान, पंकज त्रिपाठी यांचा जन्म २८ सप्टेंबर १९७६ रोजी बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील बेलसंड या गावात झाला आहे. बिहारच्या छोट्या गावातून सुरु केलेला बॉलीवूडपर्यंत प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांना आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. सध्या त्यांचा अक्षय कुमारसह मुख्य भूमिकेत असलेला ‘OMG 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे.