भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित असणारा ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. याबाबत दिग्दर्शक रवी जाधव आणि चित्रपटात अटल बिहारी यांची भूमिका निभावणारे अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. याचं शूटिंग मुंबई, दिल्ली, कानपूर आणि लखनऊसह वेगवेगळ्या ठिकाणी ४५ दिवसांत झालं. मुंबईत शेवटचा सीन पार पडला.

नुकताच याचा व्हिडीओ रवी जाधव आणि पंकज त्रिपाठी यांनीही चाहत्यांसाठी शेअर केला आहे. यानंतर नुकतंच चित्रपटातील अभिनेते पंकज त्रिपाठी आणि त्यांचे कुटुंब हे एयरपोर्टवर पाहायला मिळाले. यावेळी अभिनेत्याच्या वर्तणूकीने कित्येकांची मनं जिंकली आहेत. पंकज त्रिपाठी हे कायम स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला या झगमगाटापासून दूर ठेवतात हे आपल्याला माहीत आहेच.

Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…
Sachet and Parampara blessed with baby boy
लग्नानंतर ४ वर्षांनी सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी मुलाचा जन्म, व्हिडीओ शेअर करून दिली Good News
Shop owner advertise poster outside shop for customers goes viral on social media
PHOTO:”कृतज्ञता आयुष्य सुंदर बनवते” दुकान मालकानं ग्राहकांसाठी लावली अशी पाटी की होऊ लागली गर्दी; वाचून तुम्हीही कराल कौतुक
Lokstta lokrang Journalism Law Director Documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…

आणखी वाचा : ‘ओपनहायमर’फेम क्रिस्तोफर नोलन स्मार्टफोन का वापरत नाही? खुद्द दिग्दर्शकानेच सांगितलं कारण

याचीच प्रचिती नुकतीच त्यांना एयरपोर्टवर पाहिल्यावर आली. एयरपोर्टवर जेव्हा पंकज आणि त्यांचे कुटुंब आले तेव्हा बऱ्याच मीडिया फोटोग्राफर्सनी त्यांच्याकडे एका फॅमिली फोटोची मागणी केली. हे करत असताना पंकज यांच्या कुटुंबाला आणि खासकरून त्यांच्या पत्नीला विचित्र वाटत असल्याने त्यांनी फोटोग्राफर्सना त्यांचे फोटो न काढायची विनंती केली. यावेळी अत्यंत शांतपणे आणि प्रेमाने त्यांनी फोटो काढणाऱ्यांना समजावलं.

यावेळी पंकज यांनी विनंती करत सांगितलं, “मी अभिनेता आहे तुम्ही माझे हवे तेवढे फोटो काढा, पण फॅमिली फोटो नको.” असं अतिशय नम्रपणे पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं, अन् ते पाहून नंतर कुणीही त्यांच्याकडे फोटोसाठी आग्रह धरला नाही. या व्हिडीओमध्ये पंकज त्रिपाठी एक साधा कुर्ता आणि पायजमा परिधान करून आल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यातील पंकज त्रिपाठी यांची विनम्रता आणि त्यांचा साधेपणा लोकांना भावला. अटल बिहारी यांच्या जीवनावर आधारित असलेला पंकज त्रिपाठी यांचा आगामी चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते; त्यामुळे आता या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Story img Loader