Kiara Advani and Sidharth Malhotra : बॉलीवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा. या कपलचा मोठा चाहता वर्ग आहे. दोन वर्षांपूर्वी दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वीच कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आणि त्यानंतर दोघांनी गुड न्यूज दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लवकरच कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आई-बाबा होणार आहेत. २८ फेब्रुवारीला दोघांनी गुड न्यूज दिली. कियाराने बाळाच्या मोज्यांचा फोटो शेअर करत लिहिलं, “आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट लवकरच येत आहे.” तेव्हापासून कियारा व सिद्धार्थवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. या गुड न्यूजनंतर पहिल्यांदाच दोघं विमानतळावर पाहायला मिळाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

२ मार्चला सकाळी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुंबई विमानतळावर पाहायला मिळाले. यावेळी सिद्धार्थ कियाराची खूप काळजी घेताना दिसला. कियारा उतरताना गाडीचा दरवाजा उडताना सिद्धार्थ पाहायला मिळाला. त्यानंतर एकमेकांचा हातात हात पकडूनच दोघं चालताना दिसले. यावेळी कियाराने लूज फ्लोरल ड्रेसवर मोकळे केस, डोळ्यावर गॉगल अशा स्टाइलिश अंदाजात दिसली. तर सिद्धार्थने डेनिम जीन्स, पांढरे स्नीकर, पांढरा टी-शर्टबरोबर ब्राउन जॅकेट घातलं होतं. दोघांचा विमानतळावरील हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर अलीकडेच कियाराचा ‘गेम चेंजर’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणबरोबर झळकली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कियाराची तब्येत बिघडली होती. तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच वेळेस कियारा गर्भवती असल्याचा अंदाज लावला जात होता.

‘गेम चेंजर’नंतर आता कियारा ‘टॉक्सिक’, ‘वॉर २’ चित्रपटात झळकणार आहे. तसंच सिद्धार्थ मल्होत्रा ‘परम सुंदरी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तो गेल्या वर्षी ‘योद्धा’ चित्रपटात झळकला होता.