परेश रावल हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ते भाजपा खासदारही होते. नुकत्याच पार पडलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्यात त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मराठी रंगभूमी व कलाकारांचे कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्यात परेश रावल यांनी राष्ट्रावादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, “नाट्यव्यवसायावरील वस्तू, सेवा कर रद्द करावा यासाठी मी अजित भुरेंसह इतर मराठी रंगकर्मींबरोबर तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील बरोबर होते”.

हेही वाचा>> “संत तुकाराम महाराज माझ्याकडे २२ वेळा आले”- सुबोध भावे

“पवारांसारखा मोठा नेता नाटकवाल्यांसाठी पुढे येतो, हे पाहूनच मी थक्क झालो. त्यांनी ज्याप्रकारे जीएसटी रद्द करण्यासाठी जेटली यांना नमविले, ते वाखाणण्याजोगे होते. त्यावेळी मी सहज त्यांना “हे तुमचे मतदार नाहीत, तरी तुम्ही पुढाकार घेतला”, असं म्हणलो होतो. यावर उत्तर देत “हा कला व संस्कृतीचा मुद्दा आहे” असं ते म्हणाले होते. त्यांच्या या उत्तराने मी भारावून गेलो होतो”, असं पुढे परेश रावल यांनी सांगितलं.

हेही वाचा>> उर्फी जावेदला झाला आहे ‘हा’ गंभीर आजार; दुबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल

परेश रावल यांनी विविधांगी भूमिका साकारुन गेली अनेक दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आता ते ‘शहजादा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paresh rawal praises ncp chief sharad pawar in loksatta lokankika kak