परेश रावल यांची पोस्ट चर्चेत ( फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )
Maharashtra Assembly Election Result 2024 Paresh Rawal Post : राज्यात नुकत्याच २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांमध्ये तब्बल २०० हून अधिक जागांवर महायुतीने आघाडी घेतल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार सध्याच्या घडीला ५० ते ५५ जागांवर आघाडीवर आहेत. या निकालावर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांसह मनोरंजन विश्वातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देत, “हा जनतेचा कौल नाही. यात काहीतरी गडबड आहे आणि मोठी गडबड आहे” असं म्हटलं आहे. त्यांच्या याच आरोपावर भाजपाचे माजी खासदार व प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी एक्स पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यावर यासंदर्भात एक्स पोस्ट देखील केली आहे. “महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही. बॅलट पेपर (मतपत्रिका) वर पुन्हा निवडणूक घ्या! जगाच्या पाठीवर निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल.” असा आरोप त्यांनी या पोस्टमधून केला आहे.
संजय राऊत यांच्या याच आरोपांवर परेश रावल यांनी मोजक्या शब्दांत “संजय उवाच । संजय उगाच च ॥” अशी पोस्ट शेअर करत त्यांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यावर प्रसाद ओक, मेघा धाडे, सलील कुलकर्णी, अभिजीत केळकर, उत्कर्ष शिंदे असे अनेक कलाकार व्यक्त झाले आहेत. दरम्यान, राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार? यापैकी महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या? हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, महायुतीने यंदा बाजी मारत बहुमतापेक्षा जास्त जागा मिळवल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिसून येत आहे.