बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा व परिणीतीला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर राघव चड्ढा व परिणीतीच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगल्या आहेत.

परिणीती व राघव चड्ढा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आप खासदार संजय अरोरा यांनी शुभेच्छा देत या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर पंजाबी गायक हार्डी सिंधुनेही परिणीती व राघव चड्ढा यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून परिणीती व राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. परिणीती व राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार असून लवकरच त्यांच्या साखरपुडा होणार आहे.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Colors marathi Pinga Ga Pori Pinga and #Lai Aavdtes Tu Mala mahaepisode
सरकार-सानिकाच्या प्रेमावर पंकजा आणणार ‘संक्रांत’ तर पिंगा गर्ल्स बुलबुल बाग वाचवण्यासाठी…; एक तासाच्या विशेष भागात काय घडणार? वाचा…
Sudhir Mungantiwar Devendra Fadnavis (1)
निमंत्रण पत्रिकेत शेवटी नाव, मुनगंटीवार नाराज? फडणवीस खुलासा करत म्हणाले, “आम्ही वाघ व वारांचा…”
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”

हेही वाचा>> दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या चर्चांवर रॅपर बादशाहची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाला, “मी…”

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, परिणीती व राघव चड्ढा यांचा साखरपुडा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे. दिल्लीत त्यांचा साखरपुडा समारंभ होणार असून दोघांच्याही घरी याची जय्यत तयारी सुरू आहे. “परिणीती व राघव चड्ढा यांचा साखरपुडा समारंभ कुटुंबीय व मित्रपरिवार अशा मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. प्रियांका चोप्राही पती निक जोनस व मुलगी मालती मेरीसह भारतात आली आहे. परिणीतीच्या साखरपुडा समारंभाला ते उपस्थितीत राहू शकतील अशा पद्धतीनेच त्यांनी भारतातील ट्रीपचं प्लॅनिंग केलं आहे”, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा>> Video: भर गर्दीत चाहत्याने पकडला अजय देवगणचा हात, नंतर अभिनेत्याने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले…

दरम्यान, परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांना दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. लंडनमध्ये एकत्र शिक्षण घेताना परिणीती व राघव यांची मैत्री झाली होती. परंतु, ते गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. जवळपास सहा महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे.

Story img Loader