बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. परिणीती व राघव चड्ढा यांना अनेकदा एकत्र स्पॉटही करण्यात आले आहे. आता परिणीती व राघव चड्ढा यांच्या लग्नाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- प्रियांका चोप्राने ‘मेट गाला’मध्ये घातला हिऱ्यांचा महागडा हार; कोटीत नाही तर अरबो रुपयांत आहे किंमत

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाली आहे. १३ मे रोजी नवी दिल्लीत या दोघांचा साखरपुडा होणार असल्याचे समोर आले आहे. सध्या परिणीती व राघव दोघेही त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र आहेत. परिणीती व राघव लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा- “तिचं लग्न झालं होतं पण..”; अनुपम खेर यांनी सांगितला किरण खेर यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा

लग्नाच्या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत माहिती परिणीती व राघव चड्ढा यांच्याकडून मिळालेली नाही. पण, परिणीती व राघव चड्ढा सहा महिन्यांत म्हणजेच २०२३च्या ऑक्टोबरमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. काही दिवसांपूर्वी परिणीतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत तिच्या हातात अंगठी दिसत होती. तिच्या हातातील अंगठी पाहून परिणीती आणि राघव यांनी गुपचूप साखरपुडा केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परिणीती चोप्राची बहीण व प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राही काही दिवसांपूर्वी भारतात आली होती. परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवरच ती भारतात आल्याचे बोलले जात होते.