परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा २४ सप्टेंबरला उदयपूरमध्ये थाटामाटात संपन्न झाला. दोघांच्याही शाही लग्नाला बॉलीवूड सेलिब्रिटी आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि परिणीती चोप्रा गेल्या अनेक वर्षांपासून फार चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे सानियाला या लग्नाचं विशेष आमंत्रण देण्यात आलं होतं. सानियाने राघव-परिणीतीच्या लग्नातील काही Inside फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “२००७ पासून…”, मुंबईतील ‘या’ कॉलेजमध्ये अभिनेत्रींनी घेतलंय एकत्र शिक्षण, हास्यजत्रेच्या सेटवरील ‘तो’ फोटो चर्चेत

सानियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव या जोडप्याने त्यांच्या पाहुण्यांना खास रुमाल दिल्याचं दिसत आहे. या रुमालावर खास संदेशदेखील लिहिण्यात आला आहे. सानियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या रुमालाची झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘ही’ लोकप्रिय मराठी गायिका आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची क्रश, नाव सांगत म्हणाला, “मला जशी ती आवडते तशी…”

परिणीती-राघवच्या लग्नात सगळ्या पाहुण्यांना पांढरा शुभ्र असा रुमाल देण्यात आला होता. यावर “आमचं लग्न पाहून जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं, तर या रुमालाचा नक्की उपयोग करा” असा गोड संदेश लिहिण्यात आला होता. सानियाने याची खास झलकर इन्टाग्रामवर शेअर केली आहे.

हेही वाचा : “द्वेष करणार्‍यांची बोलती…”, किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या आठवणीत भावुक पोस्ट, म्हणाले, “खोट्या आरोपांच्या जखमा…”

दरम्यान, २४ सप्टेंबरला उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये या आलिशान हॉटेलमध्ये राघव-परिणीतीचा विवाहसोहळा पार पाडला. दोघांच्या लग्नासाठी खास तयारी करण्यात आली होती. चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, बॉलीवूड सेलिब्रिटी, राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी या नव्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी उदयपूरमध्ये उपस्थित होते. लवकरच, राघव आणि परिणीती बॉलीवूडकरांसाठी खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parineeti chopra and raghav chadha gave their wedding guests a customised handkerchief sania mirza shared photos sva 00