अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा या दोघांच्या लग्नाच्या चांगल्याच चर्चा सुरू आहेत. महिनाभरापूर्वी ते मुंबईत एकत्र दिसले होते, लवकरच ते लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच हे दोघे आयपीएलचा सामना पाहायला स्टेडियममध्ये गेले होते. राघव व परिणीतीला एकत्र पाहून क्रिकेट चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडले होते. यादरम्यानचा दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरून दोघांचा साखरपुडा झाला की काय, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री अदा शर्मा भडकली, म्हणाली…
या फोटोंमध्ये परिणीती राघव यांच्या अगदी जवळ उभी आहे. राघव यांच्या खांद्यावर डोके ठेवून ती मॅच पाहत आहे. या फोटोंमध्ये परिणीतीच्या हातात अंगठी दिसत आहे. त्यावरून या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाली असल्याची बातमी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिली होती. १३ मे रोजी नवी दिल्लीत या दोघांचा साखरपुडा होणार असल्याचे समोर आले होते. सध्या परिणीती व राघव दोघेही त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र आहेत. आता या फोटोमुळे त्यांचा साखरपुडा झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा- सलमान खानबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत पलक तिवारीने पुन्हा दिलं स्पष्टीकरण; म्हणाली, “माझी चूक…”
परिणीतीला पाहताच चाहत्यांनी दिल्या होत्या घोषणा
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्या दरम्यानचा आयपीएल सामना पाहण्यासाठी पंजाब क्रिकेट असोसिएशन मोहालीत पोहोचलेल्या राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले होते. दोघांचे अनेक फोटो समोर आले आहेत, पण व्हिडीओ मात्र खूपच मजेदार दिसत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव स्टेडियममध्ये प्रेक्षकांत उभे असल्याचे दिसत आहे. या वेळी परिणीती चोप्राला पाहून चाहत्यांनी ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या.