बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा सध्या चर्चेत आहेत. नुकताच या दोघांचा दिल्लीत साखरपुडा झाला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. साखरपुड्यानंतर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. तर दुसरीकडे राघव यांच्या कमाईचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
राघव चड्ढा यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९८८ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी डीयूमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सीएचे शिक्षण घेतले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून ईएमबीएसची पदवीही घेतली. त्यांनी काही काळ प्रॅक्टिसिंग-चार्टर्ड अकाउंटंट म्हणूनही काम केले. राघव सध्या राजकारणात सक्रिय आहेत. राघव ‘आम आदमी पक्षा’चे खासदार आहे.
राघव यांच्या मासिक पगाराचा विचार केला तर खासदारांचा मूळ पगार ३० हजार आहे. मात्र, त्यासोबत त्यांना अनेक भत्तेही मिळतात. पगार आणि मिळणारे भत्ते धरून राघव चढ्ढा यांचा मासिक पगार एक लाख रुपये आहे. याशिवाय त्यांना अनेक सुविधाही मिळतात.
राघव यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची संपत्ती आहे. दुसरीकडे, परिणीती कमाईच्या बाबतीत राघवपेक्षा खूप पुढे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती एका महिन्यात ४० लाख रुपयांहून अधिक कमवते आणि तिची एकूण मालमत्ता ६० कोटींच्या जवळपास आहे. परिणीतीकडे मुंबईत सीव्ह्यू लक्झरी अपार्टमेंटसह अनेक महागडी वाहनेही आहेत.
हेही वाचा- आलिया भट्टनंतर आता सासूबाईंनीही खरेदी आलिशान घर; किंमत जाणून अवाक् व्हाल
परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची बरीच चर्चा आहे. बातम्यांनुसार दोघेही ऑक्टोबरमध्ये लग्न करू शकतात. दोघांचे कुटुंबीय शाही लग्नाच्या तयारीत आहेत. या लग्नात बॉलीवूड आणि राजकारणातील नामांकित व्यक्ती हजेरी लावणार आहेत. परिणीती आणि राघव यांचे लग्न दिल्लीत किंवा राजस्थानमधील एका शाही ठिकाणी होण्याची शक्यता आहे.