बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आम आदमी पार्टी’चे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा दिल्लीत संपन्न झाला. या सोहळ्याला बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. साखरपुडा झाल्याची माहिती दिल्यावर राघव-परिणीतीवर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या नवीन जोडप्याला सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिल्यावर परिणीतीची आई ‘रीना चोप्रा’ यांनीही आपल्या लेकीसाठी आणि जावयासाठी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “हा शेवटचा चित्रपट…” ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचे वक्तव्य, म्हणाली “पुन्हा संधी मिळेल की नाही…”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”

परिणीती आणि राघव यांचा फोटो शेअर करीत ‘रीना चोप्रा’ लिहितात, “तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, ‘देव’ आहे यावर तुमचा विश्वास बसतो. आमच्या आयुष्यात आलेला हा सुंदर प्रसंग त्याचेच एक उदाहरण आहे…यासाठी मी देवाचे मनापासून आभार मानते. तसेच तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यासाठी मन:पूर्वक धन्यवाद!” ही भावुक पोस्ट शेअर करीत ‘रीना चोप्रा’ यांनी मुलीला आणि जावयाला आशीर्वाद दिले आहेत.

हेही वाचा : “सेटवर सोडतोस का?” अनोळखी व्यक्तीबरोबर ‘बिग बीं’ची बाईक राईड, नेटकरी म्हणतात…

परिणीतीच्या आईने साखरपुडा सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये राघव-परिणीतीसाठी संपूर्ण चोप्रा कुटुंबीय आनंदी असल्याचे दिसून येत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा खास भारतात आली होती. तिनेही आता आपल्या बहिणीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, परिणीती शेवटची अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्यासोबत सूरज बडजात्याच्या ‘उंचाई’ चित्रपटात दिसली होती. लवकरच इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’मध्ये परिणीती दिलजीत दोसांझबरोबर काम करणार आहे.

Story img Loader