बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये दोघेही लग्न करणार आहेत, असा दावा केला जात आहे. नुकतेच पुन्हा एकदा परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा विमानतळावर एकत्र दिसले. त्यानंतर लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय.
Indian Idol 13: ऋषी सिंह ठरला ‘इंडियन आयडला १३’चा विजेता, दत्तक लेकाने उंचावली आई-वडिलांची मान
दोघांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरू लागल्यानंतर परिणीती चोप्राचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती आयुष्यात कधीही कोणत्याही राजकारण्याशी लग्न करणार नाही, असे म्हणताना दिसत आहे. फरीदून शहरयार नावाच्या अकाउंटवरून परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तिचा हा व्हिडीओ ‘हंसी तो फसी’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये परिणीती सिद्धार्थ मल्होत्राबरोबर दिसत आहे.
परिणीती चोप्राशी लग्न कधी करणार? या प्रश्नावर खासदार राघव चड्ढा लाजत म्हणाले…
व्हिडीओत रॅपिड फायर राउंडमध्ये परिणीती चोप्राला राजकारण्याशी लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारला जातो. यावर ती म्हणते,”समस्या ही आहे की मला कोणत्याही राजकारण्याशी कधीच लग्न करायचे नाही. अनेक चांगले पर्याय आहेत, पण मला राजकारण्याशी कधीच लग्न करायचे नाही.” परिणीती व खासदार राघव चड्ढा यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्यानंतर तिचा हा जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
“मला प्रवास, पाणी, समुद्र खूप आवडतो. त्यामुळे ज्या व्यक्तीला या गोष्टी आवडतात, तीच मला आवडेल,” असंही परिणीती या मुलाखतीत म्हणाली होती. दरम्यान, राघव व परिणीती एकत्र दिसत असले तरी या दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दलच्या चर्चांवर कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही.