बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शनिवारी दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी या दोघांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. आता त्यांच्या साखरपुड्यातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा हा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ने पोस्ट केला आहे. या व्हिडीओत परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे केक कापताना दिसत आहेत. यावेळी ते दोघेही जण फार आनंदात असल्याचे दिसत आहे. तर परिणीती ही एका गाण्यावर लिपसिंक करत नाचताना दिसत आहे.
आणखी वाचा : Made For Each Other! परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?
यानंतर परिणीती ही राघव चड्ढा यांना केक भरवते. तर राघव चड्ढाही तिला केक भरवताना पाहायला मिळत आहे. परिणीतीला नाचताना पाहून राघव चड्ढा तिला गालावर किस करतात. त्यानंतर राघवही छान पंजाबी स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहेत. यानंतर सर्वात शेवटी राघव चड्ढा हे परिणीतीला लिप किस करताना दिसत आहे.
परिणीती आणि राघव यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करत परिणीती आणि राघव यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “अखेर ती ‘हो’ म्हणाली…” परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचा पहिला फोटो अखेर समोर
दरम्यान परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याच्या खास फोटोंची सोशल मीडियात चर्चा पाहायला मिळत आहे. यावेळी परिणितीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघवनेही त्याच रंगाचा सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. “मी प्रार्थना केली… अखेर ती हो म्हणाली”, असे कॅप्शन राघव यांनी या फोटोला दिले आहे. या फोटोत राघव चड्ढा आणि परिणिती साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे.