बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. परिणीती-राघव यांचा १३ मे रोजी दिल्लीत साखरपुडा झाला. या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता दोघांच्या साखरपुड्याचा एक इनसाइड व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये परिणीती आणि राघवची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा- लग्नाआधी मुलगी गरोदर असल्याचं कळताच नेहा धुपियाच्या आई-वडिलांना ठेवली होती ‘ही’ मोठी अट, खुलासा करत अभिनेत्री म्हणाली…

zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”

या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव दोघेही स्टेजवर उभे आहेत. परिणीतीच्या हातात माईक आहे आणि ती म्हणतेय की, सगळे म्हणायचे, परिणीती यार मुलगा शोध. यानंतर परिणीती राघवकडे बोट दाखवते आणि ‘हा ठीक आहे?’ असं म्हणत आपल्या कुटुंबाला प्रश्न विचारते. परिणीतीचा हा प्रश्न ऐकून चोप्रा कुटुंबाने ओरडून होकार दिल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यानंतर परिणीती म्हणते की, चोप्रांनी होकार दिला आहे. यानंतर परिणीतीने सासरच्या मंडळींना विचारले की, आता चड्ढाज तुम्ही स्वीकार करता का? परिणीतीच्या या प्रश्नावर प्रत्येक जण आनंदाने ओरडू लागतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

परिणीती आणि राघव यांनी साखरपुड्यात जबरदस्त डान्सही केला. या व्हिडीओमध्येही परिणीती आणि राघव ‘मेरा लौंग गावचा’ गाण्यावर गायक मिकासोबत स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. राघवही परिणीतीसोबत ताल जुळवताना दिसत आहे.

हेही वाचा- “तो चित्रपट केवळ हृतिकसाठी…” करीना कपूरने सांगितलेलं ‘कहो ना प्यार है’मध्ये काम न करण्यामागील कारण

परिणीती आणि राघवच्या लग्नाची बरीच चर्चा आहे. बातम्यांनुसार दोघेही ऑक्टोबरमध्ये लग्न करू शकतात. दोघांचे कुटुंबीय शाही लग्नाच्या तयारीत आहेत, ज्यात बॉलीवूड आणि राजकारणातील नामांकित व्यक्ती हजेरी लावणार आहेत. परिणीती आणि राघव यांचे लग्न दिल्लीत किंवा राजस्थानमधील एका शाही ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

Story img Loader