बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा हे दोघेही लवकरच साखरपुडा करणार आहेत. त्या दोघांच्याही साखरपुड्याची जय्यत तयारी केली जात आहे. त्यातच आता परिणितीच्या घराचा व्हिडीओ समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण या दोघांनीही त्यांच्या नात्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केला नव्हता. त्यातच आता परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे. येत्या १३ मे रोजी हे दोघेही साखरपुडा करणार असल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा ‘या’ तारखेला करणार साखरपुडा, जय्यत तयारीला सुरुवात

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

यातच आता परिणितीच्या मुंबईतील घराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तिच्या घराबाहेर रोषणाई केल्याचे पाहायला मिळत आहे. परिणिती राहत असलेल्या संपूर्ण घराला बाहेरुन रोषणाई केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत याची झलक पाहायला मिळत आहे. यावरुन अनेकांनी तिच्या साखरपुड्याची तयारी सुरु झाल्याचे म्हटले आहे.

परिणिती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी १५० लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असणार आहे. त्यांच्या साखरपुडा समारंभात सकाळी सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या हातात अंगठी घालत साखरपुडा करतील. यानंतर छान डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.

आणखी वाचा : प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान झाली आई, पोस्ट करत म्हणाली “आम्हाला आनंदाचा खरा अर्थ…”

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या वर्षाच्या अखेरीस हे दोघेही विवाहबंधनात अडकू शकतात, अशी चर्चा समोर येत आहे. मात्र अद्याप याबदद्ल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader